BMC Budget 2026-27: मुंबई महापालिकेच्या (BMC Budget 2026-27) स्थायी समितीमार्फत वितरित करण्यात आलेल्या तब्बल 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) निधी वाटप करताना विरोधकांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला जातो आहे. विशेष म्हणजे, एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) नगरसेवकांना केवळ 25 लाखांचा निधी देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याउलट, प्रथमच निवडून आलेल्या एमआयएमच्या (MIM) आठ नगरसेवकांना किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या या ‘एमआयएम प्रेमावर’ राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, निधी वाटपाचा निकष नेमका काय होता, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Continues below advertisement

MIM : एमआयएमच्या नगरसेवकांना मिळालेला निधी पुढीलप्रमाणे—

प्रभाग १३४ – मेहजाबीन अतिक अहमद खान

Continues below advertisement

प्रभाग १३६ – जमीर कुरेशी

प्रभाग १३७ – शमीर पटेल

प्रभाग १३८ – रोशन इरफान शेख

प्रभाग १३९ – शबाना आतिफ शेख

प्रभाग १४० – विजय उबाळे

प्रभाग १४३ – शबाना मोहम्मद फारूक काझी

प्रभाग १४५ – खैरनुसा अकबर हुसेन

दरम्यान, विरोधकांचा आरोप आहे की, राजकीय समीकरणे आणि अप्रत्यक्ष पाठिंबा लक्षात घेऊन निधी वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, भाजपकडून मात्र निधी वाटप हे विकासकामांच्या गरजेनुसार आणि प्रभागांच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेतील निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, आगामी सभागृहात यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

BMC : कोणत्या नगरसेवकाला किती कोटी मिळाले, वाचा संपूर्ण यादी

(सभागृह नेते)

गणेश खणकर – 20 कोटी

(शिवसेना गटनेते)

अमेय घोले – 10 कोटी

(उपमहापौर)

संजय घाडी – 10 कोटी

(स्थायी समिती अध्यक्ष)

प्रभाकर शिंदे – 2.50 कोटी

(महापौर)

रितू तावडे – 2.25 कोटी

इतर पक्षांना (गटनेत्यांना) मिळालेला निधी

(काँग्रेस गटनेते)

आश्रफ आजमी – 2 कोटी

(उभाठा गटनेते)

किशोरी पेडणेकर – 2 कोटी

(मनसे गटनेते)

यशवंत किल्लेदार – 2 कोटी

(MIM गटनेते)

विजय उबाळे – 2 कोटी

(राष्ट्रवादी अजित पवार गट)

डॉ. सईदा खान – 3 कोटी

(राष्ट्रवादी, .पवार गट)

अजित रावराणे – 2.25 कोटी

एकंदरीत, या निधीत विकास कामे कशी करायची? असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. निधी वाटपात सत्ताधाऱ्यांना कोटींचा फायदा तर विरोधकांना मर्यादित निधी मिळाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या संदर्भात निधी वाटपाचा तपशील पाहता 227 नगरसेवकांना किमान 1 कोटी प्रत्येकी देण्यात आले आहेतर महापौर निधीसाठी 150 कोटी, असे एकुण 377 कोटींचा वाटप आहेमात्र 432 कोटींचा निधी समसमान वाटपाचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र तफावत दिसून येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या