कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, राज्यात भाजप दोन उपमुख्यमंत्री (West Bengal Next Deputy CM) देण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, महिला सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून एका महिला नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निरीक्षक (पर्यवेक्षक) म्हणून कोलकात्यात पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप एका मुख्यमंत्र्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेऊ शकते.(West Bengal Next Deputy CM)
West Bengal Next Deputy CM: महिला प्रतिनिधीत्वाला विशेष महत्त्व दिले जाणार
बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे, असा संकेत देण्यासाठी एका महिला नेत्याला उपमुख्यमंत्री पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढील काही तासांत उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे कोण असतील, याचे चित्र स्पष्ट होईल. बंगालमध्ये सर्वसमावेशक सरकार देण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यामध्ये महिला प्रतिनिधीत्वाला विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री (West Bengal Next Deputy CM) देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यातील एक उपमुख्यमंत्री महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक म्हणून कोलकत्यामध्ये दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचं नाव आघाडी वरती आहे तर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून दोघांना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे, यामध्ये एका महिलेची निवड केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.(West Bengal Next Deputy CM)
West Bengal Next Deputy CM: बंगालमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचारामध्ये ऐरणीवर
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी कोणत्या चेहऱ्यांना संधी देणार ते उद्यापर्यंत समोर येईल. तर दोन उपमुख्यमंत्री देण्यामागे भाजपचा विशिष्ट उद्दिष्ट असू शकतं अशी चर्चा आहे. बंगालमध्ये जे सरकार स्थापन होत आहे त्या सरकारकडून बंगालच्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे एक मुख्यमंत्री आणि त्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री अशी स्थितीची चर्चा असल्याची माहिती आहे त्यामुळे भाजप दोन उपमुख्यमंत्री देण्यावर भर देऊ शकत अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचं नाव आघाडीवर असून उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचारामध्ये ऐरणीवर आला होता, गेला काही वर्षात अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे महिला उपमुख्यमंत्री देऊन भाजप महिला सुरक्षेवर आम्ही गंभीर आहोत असं संकेत देऊ शकतं, आज अमित शाह बंगालमध्ये पोहोचले आहेत, आज विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल त्यानंतर पुढील चित्र अधिक स्पष्ट होईल.
West Bengal Next Deputy CM: राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता राज्याच्या नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये काही प्रमुख नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. याशिवाय सिलीगुडी आणि उत्तर कोलकाता भागातील एखाद्या मोठ्या नेत्यालाही उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
West Bengal Next Deputy CM: शुभेंदू अधिकारी यांचे मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित
दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यास संघाच्या विचारसरणीशी घट्ट नाळ असलेल्या एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यात येऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुभेंदू अधिकारी यांचे मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. तृणमूल काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही सांभाळली. विशेष म्हणजे, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये आणि २०२६ च्या निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघात त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. गेल्या पाच-सहा वर्षांत ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर आक्रमकपणे टीका करणारा भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून शुभेंदू अधिकारी यांची ओळख निर्माण झाली आहे.
West Bengal Next Deputy CM: बंगालमध्येही ‘डिप्टी सीएम फॉर्म्युला’ लागू करू शकते
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोलकाता दौऱ्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदासोबत उपमुख्यमंत्रीपदही दिले जाणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांचा दाखला देत भाजप पश्चिम बंगालमध्येही ‘डिप्टी सीएम फॉर्म्युला’ लागू करू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पश्चिम बंगाल हे देशातील महत्त्वाचे राजकीय केंद्र मानले जाते. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्यासाठी भाजप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दुहेरी नेतृत्व रचना उभी करू शकते. राज्यात प्रामुख्याने ‘भद्रलोक’ आणि सर्वसामान्य वर्ग असे दोन मोठे मतदार गट मानले जातात. या दोन्ही वर्गांना प्रतिनिधित्व देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांचा वापर केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याशिवाय मतुआ आणि चंद्रवंशी समाजाने सुरुवातीपासून भाजपला मोठा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या समाजातील एखाद्या प्रभावी नेत्यालाही उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आज सायंकाळी ४ वाजता भाजपच्या आमदार दलाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदाबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची रणनीती यशस्वीपणे राबवली आहे. काही राज्यांत भाजपने स्वतःच्या पक्षातील नेत्यांना उपमुख्यमंत्री केले आहे, तर काही ठिकाणी मित्रपक्षांना हे पद देण्यात आले आहे. जातीय आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी भाजपने अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला वापरल्याचे पाहायला मिळाले आहे.
