Vitthal Rukmini mandir Pandharpur : सध्या सुरू असलेल्या मे महिन्याच्या सुट्ट्या आणि देशभरातून रोज येत असलेले हजारोंच्या संख्येने पर्यटक यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Vitthal Rukmini mandir Pandharpur)  दर्शनासाठी लांबच लांब रांगालागल्याचेचित्रआहे. असे असताना पंढरपूरमध्ये (Pandharpur) भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर व्हीआयपी (VIP) दर्शनासाठी गोंधळ घातल्याचे किळसवाण चित्र पाहायला मिळालेय. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांच्या पंढरपूर दौऱ्या वेळी विठ्ठल मंदिराच्या बाहेर मोठा गोंधळ झाला. भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठलाचे थेट आणि व्हीआयपी दर्शन मिळावे, यासाठी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर धक्काबुक्की, ढकलाढकली आणि गोंधळ केलेला दिसून आला.

दरम्यान, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे पंढरपुरात आले होते. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही होते. त्यावेळी कृष्णराज महाडिक आणि त्यांच्या सोबत मोजक्या तीन ते चार लोकांना विठ्ठल मंदिरात व्हीआयपी गेटवरून प्रवेश देण्यात आला. मात्र कृष्णराज महाडिक यांच्यासोबत दर्शन घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मात्र व्हीआयपी गेटवर मोठी गर्दी करून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळीकाहीसागोंधळउडाल्याचेचित्रबघायलामिळालंआहे. मात्रअसेअसतानासर्वसामान्यांनालांबचलांबरांगेतउभेराहावंलागतअसतानादुसरीकडेराजकीयमंडळींनामिळणाऱ्या सोयींमुळेनागरिकांनीसंतापव्यक्तकेलाआहे.

Pandharpur News : अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर ओव्हर पॅक, चार लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी 

दरम्यान, रविवारपासून सुरू झालेल्या पुरुषोत्तम अर्थात अधिक मासानिमित्त पहिल्याच दिवशी पंढरपुरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली असून जवळपास चार लाखापेक्षा जास्त भाविकांमुळे पंढरपूर ओवर पॅक झाल आहे. रविवारपासून एक महिनाभर पुरुषोत्तम अर्थात अधिकमास सुरू राहणार असून आता रोज अशाच पद्धतीने देशभरातील भाविकांची गर्दी पंढरपुरात असणार आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी 5 तासाचा कालावधी लागत असून मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेचे योग्य नियोजन केले आहे.

Vitthal Rukmini mandir : विठ्ठल दर्शनासाठी 5 तासाचा कालावधी 

पुरुषोत्तम अधिकमासात विष्णूची आराधना केली जाते. विठ्ठल हे विष्णूचे रूप असल्याने या काळात वारकरी भक्तांसह तमाम विठ्ठल भक्त पंढरपुरात येऊन चंद्रभागास्नान, नगर प्रदक्षिणा करत विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात. आजपासून एक महिनाभर पुरुषोत्तम अधिकमासात विविध धार्मिक कार्यक्रम व भजन कीर्तन होऊन एक आध्यात्मिक पर्वणी पंढरपुरात अनुभवायला मिळणार आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या