BJP on Uddhav Thackeray : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT)  वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले. आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय.    

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,  अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले. संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रकर परिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे, असा पलटवार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक बिल काल मांडले.  किरेन रिजिजू यांनी बिल मांडलं, गोमास खाण्याचं समर्थन यांनी केलं होतं ते बिल मांडतात हा योगायोग आहे. लोकांना झुजवायचं आणि राजकीय पोळी यांना भाजायची आहे. सुधारणा विधेयकमध्ये काही मुद्दे चांगले आहेत. वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषण अमित शाह यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी केली. जे तुम्ही म्हणताय आम्ही हिंदुत्व सोडलं, ते गद्दार मुस्लिमांची स्तुती करत होते. तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार? भाजपला मी आवाहन करतो किंवा आव्हान करतो. तुम्ही झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आम्ही विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, हे जमिनी बळकावणार आहेत आणि मित्रांच्या घशात तुम्ही जमिनी घालणार आहात. भाजपने काल जिन्नाना लाजवेल, अशी बाजू मुस्लिमांची घेतली, अशी टीका त्यांनी केली होती. 

आणखी वाचा

Nilesh Rane on Shiv Sena UBT : बाप मेल्यासारखी उबाठाची अवस्था, वक्फ विधेयकावरुन निलेश राणे यांची टीका