एक्स्प्लोर

राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं

एकतर माळशिरस तालुक्याचा निकाल 9 पैकी 7 जिल्हा परिषदा आम्ही जिंकल्या आहेत. सातपुते यांनी मीडिया मॅनेजमेंट करून एक जागा निवडून आणली

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून चक्क पालकमंत्र्यांनीच गंभीर आरोप केल्याने, आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माळशिरसमधील भाजप नेते राम सातपुते यांची हत्या करण्याचा कट होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. तर, त्यास राम सातपुते यांनी दुजोरा देत धैर्यशील मोहिते पाटील (dhairysheel patil) यांच्या गटातील काही लोक असल्याच पुढे म्हटलं. त्यावरुन, आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी पलटवार केला आहे. 

एकतर माळशिरस तालुक्याचा निकाल 9 पैकी 7 जिल्हा परिषदा आम्ही जिंकल्या आहेत. सातपुते यांनी मीडिया मॅनेजमेंट करून एक जागा निवडून आणली, निवडणूक आली अन् पराभव झाला की ते वेगळ्या विचारात जातात आणि प्रसिद्धी झोतात ठेवण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात, असा पलटवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. राम सातपुते हे कोणत्याही स्तराला जाऊन कोणतीही बातमी देतात. माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांना पूर्ण अपयश आले म्हणून दोघेही वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणूनच, कामापासून लक्ष विचलित करणे, चुकीच्या दिशेने लोकांना घेऊन जायचं हे त्यांचं नेहमीच आहे. निवडणूक आल्यावर सपाटून आपटतात, म्हणून दरवेळेस त्यांच्या बुद्धीवर गंज चढतो आणि मग कोणत्याही स्तराला जातात, अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. 

राम सातपुतेंमुळेच गोंधळ झाला

मतमोजणीच्या वेळेस सगळ्या पक्षाचे समर्थक एका जागेवर उभे असतात. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना दूर ठेवले पाहिजे. मतमोजणीच्या वेळेस राम सातपुते तिथे गेले आणि त्यांनी आमच्या माने नावाच्या उमेदवाराच्या तोंडावर गुलालाची गन मारली, म्हणून तिथं गोंधळ झाला. मात्र, राम सातपुते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही स्तराला जातात. सातपुतेंच्या पत्नीच्या विरोधात आमच्या कुटुंबातील उमेदवार देऊन त्यांना तिथेच अडकून ठेवण्याचं आमची व्यवहरचना होती, त्यात आम्हाला यश मिळाले, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. 

उमेश पाटलांनी सौंदत्तीला जावं

जिल्हापरिषद निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटलांना टोला लगावला. उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि संन्यास घेणार असतील तर त्यांनी सौंदत्तीला जावं. मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेलं यश जे नरेंद्र मोदी, फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून जनतेने दिलं आहे. उमेश पाटील यांनी आता तरी त्यांनी शहाण व्हावं, मोहोळ तालुका सुसंस्कृत तालुका आहे. खोटी आश्वासन देणे, टीका टिपन्नी करणे मान्य नाही, हा जनतेने दिलेला संदेश आहे. उमेश पाटील हे शब्दाचे पक्के असतील आणि संन्यास घेणार असतील तर मोहोळचे महंमद आहेत. त्या महंमदाकडून ड्रेस देतो, ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदत्तीला जावं, हा मी त्यांना सल्ला देतो, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटलांवर टीका केली. 

हेही वाचा

भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
Anil Parab: मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
Buldhana Crime : सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या नामांकित कंपनीवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
Embed widget