नवी दिल्ली: संसदेत 'अँटी पेपर लीक' म्हणजेच लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ वर चर्चा सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ पाहायला मिळाला. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली. पुस्तकाचा संदर्भ देत निशिकांत दुबे (Nishikant Dubey) म्हणाले, "मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते."(Nishikant Dubey)

Continues below advertisement

अध्यक्षांच्या (स्पीकर) कडे पाहत दुबे (Nishikant Dubey) म्हणाले, "सर, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी पुस्तकातून हे दाखवून देतो की, नेहरू रंगेल होते, तर होतेच." या विधानानंतर संसदेत काही काळ जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रियंका गांधी यांच्याकडून माफीची मागणी लावून धरली. "मी ॲडव्हिना माउंटबॅटन यांचे पुस्तक, नेहरूंचे सचिव मथाई यांचे पुस्तक आणि पद्मजा नायडू यांच्या पत्रांच्या संकलनात जे लिहिले आहे, तेच बोललो आहे. जर त्या पुस्तकांना नेहरू-गांधी कुटुंबाने आव्हान दिले नाही किंवा त्यावर बंदी घातली नाही, तर मला का रोखले जातेय? मी तर पुस्तकात जे लिहिले आहे तेच सांगत आहे", असंही निशिकांत दुबे यांनी तो व्हिडीओ पोस्ट करत सोशल मिडीयावरती म्हटलं आहे.

priyanka gandhi: 'पंतप्रधानांनी कॅमेऱ्याचा नाही, तर मनाचा अँगल बदलावा'

या चर्चेत सहभागी होताना काँग्रेस सरचिटणीस आणि केरळच्या वायनाड येथील खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी (२८ जुलै) लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "पंतप्रधानांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत. जर सरकारला 'जेन झेड' (Gen Z - युवा पिढी) चा विश्वास पुन्हा जिंकायचा असेल, तर पंतप्रधानांना केवळ 'कॅमेऱ्याचा अँगल' नाही, तर 'मनाचा अँगल' देखील बदलावा लागेल."(Nishikant Dubey)

दिल्लीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांनी सवाल केला की, "कोणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिले पाहिजे. आमचे विद्यार्थी काय दहशतवादी आहेत का?" त्या म्हणाल्या की, देशातील जनता सरकारकडे उत्तर मागतेय, पण त्यांना उत्तर मिळत नाहीये.

priyanka gandhi: देश खासदारांची जहागीर नाही, ती जनतेची अमानत

प्रियंका गांधी म्हणाल्या की, हा देश "खासदारांची जहागीर नसून जनतेची अमानत आहे" आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आज देशातील तरुणांना कष्टांपेक्षा बेईमानीला जास्त महत्त्व दिले जात आहे असे वाटू लागले आहे. शिक्षण व्यवस्थेत गंभीर त्रुटी असून मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, तर कुटुंबे कर्ज काढून मुलांना शिकवत आहेत.

यावेळी त्यांनी नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही गंभीर आरोप करत टोला लगावला. "पंतप्रधानांनी नव्या शिक्षण मंत्री म्हणून अशा व्यक्तीची निवड केली आहे, ज्यांनी एका गरोदर बलात्कार पीडितेच्या दोषींच्या सुटकेला सहमती दर्शवली होती," असा आरोप त्यांनी केला.

priyanka gandhi: गेल्या १० वर्षांत १५२ पेपर लीक!

शिक्षणाच्या ढासळत्या स्थितीवर बोट ठेवताना प्रियंका गांधी यांनी आरोप केला की, गेल्या १० वर्षांत देशात १५२ पेपर लीक झाले, परंतु कोणावरही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. देशाची शिक्षण प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "तत्कालीन शिक्षण मंत्री (धर्मेंद्र प्रधान) यांनी अत्यंत लज्जास्पद परिस्थितीत राजीनामा दिला, पण संसद परिसरात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांचे एखाद्या 'सुपरस्टार'सारखे स्वागत केले." सरकारला नक्की कसला अहंकार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "नवी नवी समित्या स्थापन करून काहीही होणार नाही. पंतप्रधान बहुदा वास्तवापासून खूप दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी आधी आपले सल्लागार बदलले पाहिजेत," असा सल्लाही त्यांनी दिला.