Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur News) काँग्रेसमधीलअंतर्गतवादाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नईतला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व चंद्रपुरातील दोन्ही नेते म्हणजेच विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar)आणि प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांची ऑनलाईन बैठक घेतली. याबैठीकीत चंद्रपूर मुद्द्यावर कुठलेही वाद विकोपाला गेलेले नाही, सामंजस्य त्या ठिकाणी आहे. आमचे 27 नगरसेवक एक संघ आहेत आणि काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरला बसेल असादावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीकेलाआहे. असंअसतानादुसरीकडे चंद्रपुरात 100% भाजप सत्ता स्थापना करणार, भाजपचाच महापौर होणार असादावाभाजपचेनेतेआणिआमदारपरिणयफुकेयांनीकेलाआहे. सोबतच जिथे जिथे हे गटागटात विभागलेले आहेतत्या काँग्रेसचे यापेक्षाही खराब हाल महाराष्ट्राची जनता करणार असल्याचीटीकाहीआमदारफुकेंनीकेलीआहे. (Chandrapur Election 2026 Result)

Continues below advertisement

Parinay Fuke on Congress : काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष तरीहीसत्ता नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट

नाचता येईना अंगण वाकडं तशीच अवस्था वडेट्टीवार यांची सध्या झालेली दिसते, त्याच प्रकारची वागणूक ते करतात, ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठींचे ऐकत नाही आणि त्यांचे नगरसेवकही त्यांचे ऐकत नाही. जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून सुद्धा ते चंद्रपूर महानगरपालिकेत सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट असल्याचीटीकाहिआमदारपरिणय फुकेंनीविजयवडेट्टीवारयांच्यावरकेलीय.

Continues below advertisement

Parinay Fuke on Vijay Wadettiwar : ....म्हणून जनता यांना मतदान करत नाही

जनता या लोकांना मतदान करत नाही, कारण त्यांना माहीत असते की यांना मतदान केलं तरी ते सरकार स्थापन करू शकत नाही, किंवा व्यवस्थित कारभार चालवू शकत नाही. यांचे आपसातील भांडणच एवढे आहेत की ते कधीच संपणार नाहीत. म्हणून जनता यांना मतदान करत नाही, म्हणून निवडणूक हरल्यावर ईव्हीएम किंवा इतर गोष्टीवर हे दोष देतात असेहीपरिणय फुकेंम्हणाले. विजय वडेट्टीवार किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या घरी माशी जरी शिंकली तरी त्याचा दोष भाजपवर देतात, त्यामुळे मला असं वाटतं की यांना स्वप्नातही भाजपच दिसते आणि ती दिसली पाहिजे, असेहीपरिणय फुकेंम्हणाले.

चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)

सध्याचे संख्याबळ

भाजप – 23

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

ही बातमी वाचा: