सोलापूर : राज्याच्या राजकारण महापालिका निवडणुकानंतर (Election) आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे, कुठे युती तर कुठे स्वबळाचा नारा देत निवडणुक लढल्या जात असल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस असल्याने पक्षांतर अन् अचानक एबी फॉर्मसह उमदेवार पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश न होताच त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे, तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जातो. 

Continues below advertisement

शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांच्या छातीवर अखेर कमळ लागलं असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पुत्र पृथ्वीराज सावंतांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरीही त्यांना ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे.  

माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. पृथ्वीराज सावंत हे माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिवाजीराव सावंत यांच्या भाजप प्रवेशाला खुद्द त्यांचे बंधू शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी विरोध केला होता. मात्र, अखेर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून बंधू शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश थांबवला होता, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर आपण भाजप महायुतीसोबत असन ही निवडणूक लढवणार असल्याचे पृथ्वीराज सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं. 

Continues below advertisement

हेही वाचा

मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा