एक्स्प्लोर

ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे.

नवी दिल्ली : देशभरात एकीकडे रमजान ईदचा (Ramdan eid) उत्साह असून दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी नववर्ष म्हणजे गुढी पाडव्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे. गुढी पाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही उत्सव एकापाठोपाठ एक आल्याने हिंदू व मुस्लिम बांधव सणाच्या तयारीला लागले आहेत. सामाजिक सौहार्द व बंधुप्रेम जपत दोन्ही सण साजरे होत आहेत. त्यातच, भाजपने (BJP) 32 लाख मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने ईदी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. 'सौगात ए मोदी' नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 32 लाख मुस्लिम बांधवांना हे कीट देण्यात येणार आहेत. या कीटसंदर्भात बोलताना भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीनिमित्ताने हिंदू बांधवांना तर बडे दिननिमित्त ईसाई बांधवांना भेटवस्तू देतात. त्यामुळे, आता ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ही भेट दिली जात असून मोदींवर सर्वच मुस्लिम बांधव प्रेम करतात, असेही गौतम यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे. देशभरातली 32 लाख गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी कीट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. भाजपच्या अल्पसंख्याने विभागाने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी, मोर्चाचे प्रभारी आणि भाजप महासचिव दुष्यंत गौतम यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.  पंतप्रधान मोदींना कुठलाही एक धर्म जास्त जवळचा नसून ते सर्वच धर्मावर प्रेम करतात. त्यामुळेच, मोदींवर सर्वच मुस्लिम प्रेम करतात. देशातील पंतप्रधान आपलाच आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यामुळेच, देशभरातली 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबात सौगात ए मोदी किट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे, असेही दुष्यंत गौतम यांनी म्हटलं. 

32 हजार कार्यकर्ता करणार काम

भाजपने देशभरातली 32 हजार कार्यकर्त्यांन या सौगात ए मोदीची जबाबदारी दिली आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एका मस्जिदची जबाबदारी घेणार आहे. त्यानुसार, देशभरातली 32 हजार मस्जिदींजवळ गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी कीटचे वाटप केले जाईल. यासह जिल्हा स्तरावर भाजपच्यावतीने ईद मिलन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलं आहे. 

सौगात ए मोदी कीटमध्ये काय?

भाजपकडून देण्यात येणाऱ्या सौगात ए मोदी कीटमध्ये नेमकं काय असणार आहे. तर, या कीटमध्ये नवीन कपडे, शेवया, खजूर, काजू-बदाम आणि साखर असणार आहे.  तर, महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल. 

हेही वाचा

स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Raigad Politics : सुनील तटकरे दगाफटका करू शकतात, त्यांना माझा कायम विरोध; अनिकेत तटकरेंनी गोगावलेंची भेट घेताच महेंद्र दळवी म्हणाले...
सुनील तटकरे दगाफटका करू शकतात, त्यांना माझा कायम विरोध; अनिकेत तटकरेंनी गोगावलेंची भेट घेताच महेंद्र दळवी म्हणाले...
Devendra Fadnavis : नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'
नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Embed widget