Akola Municipal Corporation Election 2026: अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र, राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चर्चेतून अखेर तिढा सुटलाय. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय. ज्यामध्ये 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (NCP) निवडणूक लढणार, तर उर्वरित जागांवर (Akola Election 2026) भाजप उमेदवार देणारेय. या घोषणेमुळे अकोल्यात शिंदेंची सेनामात्र एकटी पडलीय. आता या महायुतीतील दोन्ही पक्षांशी शिंदोंच्या सेनेची अकोला महापालिकेत मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणारेय.

Akola Election 2026:  भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शिवसेना 80 जागांवर उमेदवार

अकोल्यात महायुती फिस्कटली असून भाजप आणिअजितदादांची राष्ट्रवादी एकत्र येत युतीची घोषणा केलीय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यत मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने हा 'ऐकला चलो रे'चा नारा दिलाय. त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणारेये. तर शिवसेना पक्ष 80 जागांवर आपले उमेदवार देणारेये, अशी घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केली.

मात्र, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजके काही तास राहिले, अशातही मंत्री संजय राठोड यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलंये. तर राष्ट्रवादीचे प्रभारी मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरींनी संजय राठोड, बाजोरिया आणि इतर सेना नेत्यांची भेट घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या निर्णयाची माहिती दिलीय.

Akola Municipal Corporation Election 2026:  महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Party-wise strength in Akola Municipal Corporation) -

एकूण जागा : 80भाजप : 48काँग्रेस : 13शिवसेना : 08राष्ट्रवादी : 05वंचित बहूजन आघाडी : 03एमआयएम : 01अपक्ष : 02

हेही वाचा

BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे, भाजपा, राष्ट्रवादीपर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!