एक्स्प्लोर

Akola Election 2026: अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' च्या युतीची घोषणा; 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार; तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

Akola Election 2026: अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र, चर्चेतून अखेर तिढा सुटलाय.

Akola Municipal Corporation Election 2026: अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र, राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चर्चेतून अखेर तिढा सुटलाय. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय. ज्यामध्ये 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (NCP) निवडणूक लढणार, तर उर्वरित जागांवर (Akola Election 2026) भाजप उमेदवार देणारेय. या घोषणेमुळे अकोल्यात शिंदेंची सेना मात्र एकटी पडलीय. आता या महायुतीतील दोन्ही पक्षांशी शिंदोंच्या सेनेची अकोला महापालिकेत मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणारेय.

Akola Election 2026:  भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शिवसेना 80 जागांवर उमेदवार

अकोल्यात महायुती फिस्कटली असून भाजप आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र येत युतीची घोषणा केलीय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यत मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने हा 'ऐकला चलो रे'चा नारा दिलाय. त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणारेये. तर शिवसेना पक्ष 80 जागांवर आपले उमेदवार देणारेये, अशी घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केली.

मात्र, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजके काही तास राहिले, अशातही मंत्री संजय राठोड यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलंये. तर राष्ट्रवादीचे प्रभारी मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरींनी संजय राठोड, बाजोरिया आणि इतर सेना नेत्यांची भेट घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या निर्णयाची माहिती दिलीय.

Akola Municipal Corporation Election 2026:  महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Party-wise strength in Akola Municipal Corporation) -

एकूण जागा : 80
भाजप : 48
काँग्रेस : 13
शिवसेना : 08
राष्ट्रवादी : 05
वंचित बहूजन आघाडी : 03
एमआयएम : 01
अपक्ष : 02

हेही वाचा

BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे, भाजपा, राष्ट्रवादीपर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही च्रकावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही च्रकावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget