एक्स्प्लोर

Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड, 'किंगमेकर' विलास पाटलांना पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडीचे माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या (Bhiwandi Mayor Election 2026) पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भिवंडीचे माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील (Vilas Patil) यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने काल (दि. 13 फेब्रुवारी) रात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणात विलास पाटील यांना अटक केली असून, घरे देण्याच्या बहाण्याने अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण 2025 मध्ये दाखल झाले होते. अटकेनंतर विलास पाटील यांना आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Bhiwandi Vilas Patil Arrest:  महापौर निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई

विलास पाटील हे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख नेते असून, त्यांच्या आघाडीचे भिवंडी महापालिकेत पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे कोणार्क विकास आघाडी ही सध्या भिवंडीतील सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरत आहे. महापौर कोणाचा होणार, याबाबत सुरू असलेल्या रस्सीखेचीत विलास पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. महायुतीत ‘ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर’ असे सूत्र ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार कोणार्क विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्याच दरम्यान विलास पाटील यांना अटक झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bhiwandi Vilas Patil Arrest: राजकीय वाद आणि अटक, चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वीच विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्यात भर रस्त्यात जोरदार वाद झाला होता. त्या घटनेनंतर आता झालेली अटक ही राजकीय खेळी असल्याची चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे. भाजपाने ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्यांच्या विनंतीला मान देत कोणार्क विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याआधीच विलास पाटील यांना अटक झाल्याने संपूर्ण राजकीय चित्रच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडीच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता

महापौर निवडणुकीच्या अगदी तोंडावर झालेल्या या अटकेमुळे भिवंडी महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या गणितावर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. कोणार्क विकास आघाडीची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhiwandi Election Results 2026 : भिवंडी महापालिका पक्षीय बलाबल

काँग्रेस -  30 
समाजवादी -  6
राष्ट्रवादी (शप)- 12
भाजपा   -  22
शिवसेना (शिंदे) -  12
शिवसेना(ठाकरे) - 
कोणार्क विकास आघाडी -  4
भिवंडी विकास आघाडी - 3
अपक्ष -1

भिवंडी एकूण जागा- 90
बहुमत आकडा- 46

आणखी वाचा 

Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'मविआतील तिन्ही पक्ष मिळून...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
Rohit Pawar: 'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Embed widget