एक्स्प्लोर

Bhiwandi Mayor Election 2026: महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महानगरपालिकेच्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महानगरपालिकेच्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेस (Congress) नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजपचे नारायण चौधरी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे तारीक मोमीन यांना मतदान करण्याचा पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी गटनेते तारिक मोमीन यांना पत्राद्वारे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, भाजपचे (BJP) नगरसेवक असलेले नारायण चौधरी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपने ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिल्याने चौधरी नाराज झाल्याची चर्चा आहे. ते काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

दुसरीकडे, भाजपाने ऐनवेळी नारायण चौधरी यांची उमेदवारी बदलल्यामुळे नारायण चौधरी नाराज होत आपल्या सोबत भाजपच्या एक नाराज गट घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये जाणार, तसेच भाजपचा महापौर पालिकेत बसणार असा व्हिप देखील काँग्रेसने जारी केले आहे.

BJP vs Shivsena : भाजपचा उमेदवाद पळून गेला, त्याचे खापर शिवसेनेवर का फोडता? मनोज काटेकर यांचा सवाल

भिवंडी महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदाची उमेदवारी जाहीर केलेले नारायण चौधरी यांनी भाजपातील एक गट व शिवसेना पक्ष सहकार्य करीत नसल्याचे कारण देत व शहराध्यक्ष रवी सावंत यांनी अचानक महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांचे नावे पत्र दिल्याने व्यथित होऊन भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प. ) पक्षाच्या सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या आरोपाचे शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी खंडन केले असून भाजपामध्ये दोन गट पडले. त्यामुळे भाजप उमेदवार पळून गेले त्याचे खापर आमच्यावर का फोडता? असा सवाल केला आहे.

भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी शिवसेना पक्षावर केलेला आरोप चुकीचा व निराधार आहे. भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 अशा 34 नगरसेवकांचे एकत्र बैठक झाली त्यावेळेस आपण एकत्र कॅम्प लावू असे ठरले होते. परंतु त्यानंतर भाजपामध्येच दोन गट पडले. त्यामुळे एक गट भाजपाच्या कॅपमध्ये गेलाच नाही. त्यानंतर आम्ही भिवंडी शहरातच राहिलो आहोत. शिवसेनेकडून तीन दिवसापूर्वी कॅम्प लावला. त्यामध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आम्ही भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांच्याशी सतत संपर्कात होतो. त्यांचे नगरसेवक एकत्र आले नाही, त्याचा दोष आमच्यावर लावणे चुकीचे आहे. भाजपाच्या नगरसेवकाने सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा आणि भिवंडी शहराच्या विकासला बाधा आणणारा आहे. शिवसेना पक्ष ज्यांना शब्द देतो ते पूर्ण करतो हा भिवंडी शहराचा इतिहास आहे.

Manoj Katekar : महापौर पदाचा उमेदवार पळून जात असेल तर ते दुर्दैवी

अशा परिस्थितीमध्ये महापौर पदाचा उमेदवार पळून जात असेल तर ते दुर्दैवी आहे. महापौर पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच ही प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसचे ३० नगरसेवक असताना एकमात्र तारिक मोमिन यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. तेव्हाच शंकेचे पाल चुकचुकली की यामध्ये काही तरी काळेबेरे आहे. म्हणून यामागे पक्षाचे पाठबळ असू शकतो. भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ सर्वच जमा करत होते. आम्हाला साथ देणारे भिवंडी विकास आघाडीचे ३ समाजवादी पक्षाचे ६ आमच्या सोबत आहेत. सत्ता स्थापन करताना सोबत येणाऱ्यांना आम्ही घेणारच .पण उमेदवार निवडणुकीच्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी ठरवायचा आहे.त्यांना अगोदरच शंका का वाटली त्यामुळे ते अगोदरच का पळून गेले असा सवाल शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी उपस्थित केला आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापालिकेतील संख्याबळ

भिवंडी महानगरपालिकेतील एकूण 90 जागांपैकी बहुमताचा आकडा 46 आहे. निवडणूक निकालानंतर विविध पक्षांचे संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे.

काँग्रेस – 30 जागा

भाजप – 22 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा

शिवसेना – 12 जागा

समाजवादी पक्ष – 6 जागा

कोणार्क विकास आघाडी – 4 जागा

भिवंडी विकास आघाडी – 3 जागा

अपक्ष – 1 जागा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget