एक्स्प्लोर

Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी

Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. बहुमतासाठी 46 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक

Bhiwandi Mahangarpalika Mayor Election: भिवंडी महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) आणि भाजपमध्ये झालेल्या राड्यानंतर विलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) जवळ केले होते. त्यांना सोबत घेऊन शिवसेना स्वत:चा महापौर बसवण्याचा प्रयत्न करत असल्याने भाजपच्या (BJP) गोटात तीव्र  नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, शिवसेनेकडून बहुतमासाठी लागणारे संख्याबळ जुळवण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शर्यत लागली आहे. त्यासाठी भाजपमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीला निकाल 16 जानेवारीला लागला होता. मात्र, आता एक महिना उलटून गेल्यानंतरही भिवंडी महानगरपालिकेत सत्तास्थापना झालेली नाही. परिणामी अजून याठिकाणी महापौर बसलेला नाही. येत्या 20 तारखेला भिवंडीत महापौरपदाची निवडणूक होईल. त्यापूर्वी भिवंडीत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. 

भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपा व शिवसेनेने महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौरपदासाठी  जुळवाजुळव सुरू केली होती. मात्र, विलास पाटील यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे भिवंडीच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. विलास पाटील यांना अटक झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भिवंडीत महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.

Bhiwandi MahanagarPalika Election: भिवंडी महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा-90

काँग्रेस-30
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-12
भाजप-22
शिवसेना-12
कोणार्क विकास आघाडी-4
समाजवादी पक्ष-6
अपक्ष-1

Nashik Mahangarpalika news: नाशिक महापालिका सभागृह नेते आणि स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये लॉबिंग

नाशिकमध्ये  महापौर आणि उपमहापौर पदाच्या शर्यतीत अपयशी ठरलेल्या नगरसेवकांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला उपमहापौरपद बहाल केल्याने ऐनवेळी संधी गमावलेले मच्छिंद्र सानप स्थायी समिती सभापतीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सभागृह नेते पदासाठी नव्याने पक्षात दाखल झालेले सुधाकर बडगुजर, गुरमित बग्गा, दिनकर पाटील  यांच्या नावाची चर्चा आहे. समिती पदांच्या वाटपात जुने आणि नव्याची सांगड घातली जाणार आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत महासभेत कोणते मुद्दे मांडायचे यासंदर्भात चर्चा होईल. 

आणखी वाचा

भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड, 'किंगमेकर' विलास पाटलांना पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
Embed widget