मुंबई : राज्यात मराठा आरक्षण (Maratha) आणि ओसीबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता आरपारची लढाई लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही ओसीबी हक्क बचाव म्हणत जरांगेच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे, पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, दरवेळेस सरकारकडून जरांगे पाटलांना (Manoj Jarange) आश्वासन दिले जाते, मागण्या मान्य केल्या जातात, तरीही पुन्हा फसणवणूक होत असल्याने आता विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.   मनोज जरांगे पाटील यांना सरकार बदमान करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी लोकं समोर करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातोय. सगळ्या पक्षाचे सगळे लोक जरांगे पाटलांना भेटले, पण देवेंद्र फडणवीस आजवर कधी भेटले का? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आंतरवाली सराटीमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला, त्याला बढती देण्यात आली आणि शंभूराज देसाईंवरती ज्याने हल्ला केला त्याला बढती देण्यात आली, असे म्हणत भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

Continues below advertisement

कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांपैकी काहींचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यावरुन, जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. “दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असे सांगितले, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?, ” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 

सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा

परभणीमधील घटनेनंतर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिज, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली. 108 ची रुग्णवाहिका वारंवार फोन करून देखील उपलब्ध झाली नसल्याने आई आणि बाळ दगावल्याच्या घटनेवरुन त्यांनी संताप व्यक्त केला. परभणी मधील घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळेच झाली असून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, त्याला सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्र केयरलेस लोकांच्या हातात आहे, केयरलेस प्रशासनाच्या हातात, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 

Continues below advertisement

हेही वाचा

108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा