Bharat Gogawale : महाविकास आघाडीच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी ही झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.   

भरत गोगावले म्हणाले की, मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.  मविआतील काही आमदार एअरपोर्टला गेले होते, त्यांना घेऊन आले होते, असा दावा त्यांनी केलाय. 

आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद

बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नाही, ते देखील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्यावेळी पद घेऊ शकले असते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव साहेब हे पद घेणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी पद स्वीकारले, त्यासोबतच आदित्य ठाकरेंना देखील मंत्रिपद दिले. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर केंद्रात आता श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिले असते, आम्ही देखील बोललो द्या. पण, त्यांनी तसे केले नाही, असे देखील गोगावले यांनी स्पष्ट केले. 

राणे साहेब पुन्हा आले असते तर...

भारत गोगावले पुढे म्हणाले की, नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते. 2014 ला आमच्या चर्चा झाल्या होत्या. आमची सगळ्यांची इच्छा होती की, राणे साहेब पुन्हा आले असते तर कोकणात शिवसेना स्ट्राँग झाली असती. पण, कुठेतरी माशी शिंकली. आता कोकणातून उबाठा गट कमी झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरूच आहे. रत्नागिरी आणि रायगड दोन्ही मिळून 15 आमदार आहेत, त्यात आमचे 8 आमदार आहे. तर उबाठाचा केवळ एक आमदार आहे. कोकणात पूर्वी बाळासाहेब असताना जशी शिवसेना मजबूत होती, तशीच एकनाथ शिंदे करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 

राष्टवादी अजित पवार गटाचे  खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनची नक्कल केली होती. यावर देखील भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, त्यांनी रुमाल खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. हा रुमाल म्हणजे गोरगरिबांचा आशीर्वाद असतो. त्यात आम्ही बगलेत घेऊन असतो. काही लोकांनी हा रुमाल वेटर सारखा खांद्यावर टाकला. आम्ही सगळ्यांनी जिवापाड काम त्यांच्यासाठी केले आहे. त्यांना निवडून आणले आणि त्यांनी तिथे आता काही करामती दाखवायला सुरुवात केली आहे. पण, हा वाद फक्त रायगडमध्ये आहे. बाकी आमचा कुठे वाद नाही. शिवसेना भाजप युती घट्ट आहे. पण, काही लोकांची वागण्याची पद्धत आम्हाला पटत नाही. म्हणून तुम्ही तुमचे संसार करा, आम्ही आमचा करतो, असे भरत गोगावले यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut on Raj Thackeray and Devendra Fadnavis : राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीत कोणत्या विषयावर चर्चा? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, महाराष्ट्रात सध्या...