Bharatshet Gogawale रायगड : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना पालकमंत्री (Raigad Guardian Minister) पदच नसल्यामुळे आता येणाऱ्या 26 जानेवारीला रायगडच्या कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलंआहे. अशातच रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, ही जनतेची इच्छा असते. मात्र वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो, अशी खदखद राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी व्यक्त केली आहे.
Raigad Guardian Minister: पालकमंत्री पदाचानिर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, ते निर्णय घेतील
रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे मागच्या वर्षी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी पुन्हा एकदा नाराजगी व्यक्त केली होती. आता येऊ घातलेल्या 26 जानेवारीला कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल यावर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. तर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचानिर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे, ते निर्णय घेतील. वर्षभरापासून हा तिढा सुरू आहे तो सुटला पाहिजे. अशीप्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीदिलीआहे.
Raigad Guardian Minister: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरेच होणार; राजीव साबळे यांचे सूतोवाच
मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्री पदासाठी अलिप्त राहिलेल्या रायगड जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री पद मिळाले नाही. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी वर्णी लागलेल्या आदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव करून शिवसेनेने हे मंत्रीपद मागे घेण्यास भाग पाडले होत. तेव्हापासून आजतागायत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार अशी चर्चा असताना आता अजित दादांचे राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी काहीही झालं तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पद अदिती तटकरे यांनाच मिळणार असल्याचं म्हणत इतरांना ही पद मिळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यामागे अनेक गोष्टी आहेत, अस म्हणत राजीव साबळे यांनी मंत्री गोगावले यांना पुन्हा डिवचल आहे.
Guardian Minister : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला दिली होती स्थगिती
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद सरू होता, महायुतीच्या नेत्यांमदध्ये धूसफूसही सुरू होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज होते. मात्र भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला होता. आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेला होणार असून, त्याअनुषंगाने सर्व तयारीसाठी भाजप हा पालकमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजतं. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
