एक्स्प्लोर

भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, आमदार-खासदार भिडले; मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले

भंडारा नियोजन भवनमध्ये डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीच बैठक सुरू असताना निधी वाटपावरून सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार व खासदार एकमेकांसमोर भिडले.

भंडारा : अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीन दिवसांपूर्वीच आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले होते. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली. भर बैठकीतच राडा झाल्यानं घटनेचे व्हिडिओही समोर आले. आता, भंडारा (Bhandara) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये (MLA) जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, यावेळी, खासदार प्रशांत पडोळे यांच्या सोशल मिडिया हँडलरचा मोबाईल काढून घेण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या जिल्ह्यात या राड्याची जोरदार चर्चा आहे. 

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीच बैठक सुरू असताना निधी वाटपावरून सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार व खासदार एकमेकांसमोर भिडले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसचे आमदार नाना पटोले, विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, खासदार प्रशांत पडोळे, भाजप आमदार परिणय फुके, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईक हे उपस्थित होते. यावेळी निधी वाटपावरून काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. त्यावरून भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यात वाद उत्पन्न झाला. 

खासदाराच्या माणसाचं मोबाईल हिसकावला

काँग्रेस आमदार-खासदार आणि सत्ताधारी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये ताणाताणी पाहायाला मिळाली. त्यानंतर बैठक नाना पटोले वगळता सर्व लोकप्रतिनिधींसोबत पालकमंत्री सावकारे यांनी नियोजन भवनमध्ये बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, या सभेचं व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्या सोशल मीडिया हँडलरचा मोबाईल तेथील अधिकाऱ्यांनी हिसकावून घेत त्याला बैठकीतून बाहेर काढलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. याबाबत पालकमंत्री संजय सावकारी यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

बेकायदेशीर रजिस्ट्री, जिल्हाधिकारी कर्डिलेंचा दणका; नांदेडमध्ये दुय्यम निबंधक तत्काळ निलंबित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला, त्यांना भवितव्य नाही; अशोक चव्हाणांची टीका 
काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला, त्यांना भवितव्य नाही; अशोक चव्हाणांची टीका 
Amol Khune : 'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
Narendra Modi : मोठी बातमी! पंतप्रधान रात्री 8.30 वाजता संबोधन करणार? काय नवी घोषणा करणार? 
मोठी बातमी! पंतप्रधान रात्री 8.30 वाजता संबोधन करणार? काय नवी घोषणा करणार? 
Chitra Wagh: महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
Embed widget