Parinay Fuke : भंडाऱ्याच्या (Bhandara News) तुमसर तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी 8 ऑक्टोबररोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुष्काळ आणि किडींच्या प्रादुर्भावाने त्यांच्या शेतीतील भात पीक अक्षरशः फस्त झालं आहे. यामुळे वैफल्यग्रस्त सपाटे या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं होतं. परिणामी भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके (Parinay Fuke) यांनी काल (शुक्रवारी) धाप इथ सपाटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी बोलताना फुके यांनी, सपाटे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहे. या शेतकरी कुटुंबियांच्या ज्या काही अडचणी असतील, मुलांचे शिक्षण असेल किंवा अन्य कुठल्याही अडचणी असतील, याबाबत आम्ही त्यांच्या सातत्याने पाठीशी राहून त्या सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्याचं अभिवचन फुके यांनी दिलं आहे. (Bhandara News)
Parinay Fuke : दुष्काळामुळे त्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान, आर्थिक मदत तातडीनं शेतकऱ्यांना मिळावी
दरम्यान, राजेंद्रजींनी फार टोकाचं पाऊल उचललं, इथं फार दुर्दैवी घटना घडली आहे. दुष्काळामुळे त्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या क्षेत्रामध्ये बावनथडी प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे या भागातील अनेक शेतकरी दुःखी आहेत. परिणामी बोनस संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. यासोबतच दुष्काळाचीही जी आर्थिक मदत आहे ती तातडीनं शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी घोषणा करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. असेही परिणय फुके यांनीसांगितलंय.
Parinay Fuke : बोनस संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निश्चितच तोडगा काढण्यात येणार
दरम्यान, धान उत्पादक जिल्ह्यातील सगळ्या आमदार आणि खासदारांची एक बैठक भुजबळ साहेबांकडे झालेली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, अनेकांवर निर्णय झालेत. धन उत्पादक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे, ती नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात संदर्भातील आदेश भुजबळ साहेबांनी दिलेले आहेत. बोनस संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक घेऊन त्यात निश्चितच तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी यावेळी दिली.
Shivsena UBT: शेतकरी आत्महत्या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लालफीतशाहीत अडकलेली त्यांची फाईल आणि पालकमंत्र्यांकडं पाच दिवसांपूर्वी कैफियत मांडल्यानंतरही मृत शेतकऱ्याला दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळं वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं आत्महत्या केली. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळं मृत शेतकऱ्याची फाईल टेबलवर पडून राहिली आणि त्यांची समस्या मार्गी लागली नाही, त्या अधिकारी आणि कर्मचार्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या विरोधात शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी केली आहे.
या सोबतच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि त्याच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री भोयर आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंधळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनानं दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलनं शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रेहपाडे यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
