Bhandara Gondia Vidhan Parishad Election 2026: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असूनत्याअनुषंगानेसर्वचराजकीयपक्षजोरदारतयारीकरतानादिसतआहे. असं असताना भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीत (Bhandara Gondia Vidhan Parishad Election 2026) मोठीराजकीयघडामोडघडलीआहे. रविवारी (काल) रात्री महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाकडून अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाची घोषणा झाली. याच, दरम्यान भंडाऱ्यात काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांना मोठा धक्का बसलाय.
पात प्रवेलाखांदूर नगरपंचायतच्या चार नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडून भाजश केला. नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे लाखांदूर नगरपंचायतचे स्वीकृत सदस्य बंटी उर्फ मुकेश सहजवानी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. तर, लोभा शिलार, वैषाली कुडेगावे, निशा बघमारे यांचा भाजप पक्ष प्रवेश आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात रात्री नागपुरात पक्ष प्रवेश झालाय.
Congress : काँग्रेस उमेदवार शोधासाठी अद्याप धावाधाव, मात्रसर्वांचाचनकार
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक राहिले असता काँग्रेस उमेदवार शोधासाठी अद्याप धावाधाव करतअसल्याचेचित्रआहे. परिणामी अजूनही काँग्रेसचा उमेदवार निश्चित झेलला नाही.शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी अनेकांना फोन करून अनेकांना उमेदवारी घेण्याची विनंती केल्याचीमाहितीआहे. मात्र सर्वानीच नकार दिल्याचीमाहितीआहे. माजी मंत्री नितीन राऊत यांना नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा पक्षाने निरीक्षक केल्याने सुनील केदार नाराज आहेत. तर निरीक्षकासोबतच्या बैठकीत सुनील केदार गैरहजर राहिलेआहे. परिणामीआता उमेदवार शोधण्याची जबाबदरी नितीन राऊत यांच्यावर ढकलली आहे. त्यामुळे शेवटी निवडणूक बिनविरोध होऊ नये, म्हणून काँग्रेसकडून उमेदवार म्हणून अनपेक्षित अशा सामान्य स्थानिक कार्यकर्त्याचे नाव देखीलपुढे येऊ शकते, अशीचर्चाआहे.
Vidhan Parishad Election 2026: महाविकास आघाडीकडे 200, तरएकट्यामहायुतीकडे 559 मतदार
नागपूर जिल्हा परिषद वगळता या मतदारसंघात एकूण 826 मतदार आहे. यात भाजपकडे 520, शिवसेनकडे 30 व राष्ट्रवादीकडे 09 असे एकूण 559 मतदार एकट्या महायुतीकडे आहे,. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 200 मतदार आहे. यात काँग्रेस कडे 170, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडे 19 व उभाठाकडे 11 नगरसेवक मतदार आहे. तर इतर पक्ष व अपक्ष मिळून मतदारांची संख्या 67 आहे. संख्याबळ बघता महायुतीसाठी हि निवडणूक एकतर्फी आहे. यामुळे भाजपने यावेळेस वेगळा प्रयोग म्हणून ब्राह्मण चेहरा म्हणून राजीव पोतदार यांना मैदानात उतरवले आहे.
महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी घोषित (Bhandara Gondia Vidhan Parishad Election 2026)
Avinash Brahmankar : अविनाश ब्राह्मणकर यांचा परिचय अविनाश आनंदराव ब्राम्हणकर जन्म 8 मार्च 1963मु.सालेबर्डी पोस्ट दिघोरी मोठी ता साकोली जिल्हा भंडारा
-शिक्षण नागपूर येथील जि.एस महाविद्यालतून B.com शिक्षण पूर्ण केले
-2005 अपक्ष प.स. सदस्य-2007 राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती -2011 ला जि.प. सदस्य निवडून आले-2019 ला भाजप प्रवेश आणि किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड-विधानसभा आणि त्यांनांतर जि प ची उमेदवारी नाकारल्याने पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश -2021 जि. प. सदस्य निवडून आले -2024 मध्ये संचलक कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखनी -2024 भाजप प्रवेश विधासभा निवडणूक लढले. त्यात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्यासोबत अटीतटीची लढत झाली. यात नाना पटोले यांनी ब्राह्मणकर यांचा 208 मतांनी निसटता पराभव झाला.-2025 भाजप जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष
Bhandara Gondia: संख्याबळ नसतानाही काँग्रेसचं थेट भाजपला आव्हान
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर आम्हीच बाजी मारणार," असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. 2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती, तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
