Vidhan Parishad Election 2026:  प्रफुल पटेल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा - गोंदियाची (Bhandara Gondia Vidhan Parishad Election 2026) जागा राष्ट्रवादी काँग्रेसला नं देता भाजप (BJP)स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. तर, ही जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपला नं देता राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते आता सरसावले आहेत. प्रफुल पटेल (Praful Patel) यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात जागा नं देता त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव भाजप करतोय का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. 457 मतदार संख्या असलेल्या या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026)

भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याचा दावा भाजपचा आहे, त्यामुळे ती ही जागा सोडायला तयार नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांची ही परंपरागत जागा असून माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी या जागेवर निवडणूक (Maharashtra Politics News) लढण्याची तयारी केली असून कुठल्याही परिस्थितीत जागा भाजपला सोडायची नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला असून या जागेमुळे महायुतीत पेच निर्माण झालाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत (Bhandara Gondia Vidhan Parishad Election 2026) 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्टींसोबत याबाबत चर्चा झाली असून राज्यातील ज्या चार जागांची मागणी करण्यात येत आहे, त्यात भंडारा - गोंदियाच्याही जागेचा समावेश आहे. या विधानसभेच्या जागेसाठी श्रेष्ठींसोबत चर्चा झाली असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा - गोंदियाचे स्थानिक नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

Bhandara Gondia: संख्याबळ नसतानाही काँग्रेसचं थेट भाजपला आव्हान

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर आम्हीच बाजी मारणार," असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.  2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती, तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.