Bhandara News : एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे उंबरठे झिजवतो. मात्र, वेळेवर उमेदवारी कापून दुसऱ्यालाच उमेदवारी मिळाल्यानं सर्वच पक्षांना बंडखोरीचाही सामना करावा लागतोय. अशात भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या एका उमेदवारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ही उमेदवारी दिली आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकाच प्रभागात आणि ती ही पती-पत्नीला. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट नवरा-बायकोला एकाच प्रभागातून उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीकडे भंडाराकरांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Continues below advertisement

Bhandara News : नवरा - बायको दोघांचीही प्रचारात आघाडी; डोअर टू डोअर प्रचारावर भर

दरम्यान, अरुण भेदे आणि त्यांची पत्नी अपर्णा भेदे या दोघांना राष्ट्रवादीने एकाच प्रभागातून उमेदवारी दिली आहे. एकाच प्रभागात पती-पत्नीच स्वतः उमेदवार असल्याने इथं आता क्रॉस वोटिंगचा प्रश्नच उद्भवणार नाही. दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत नगराध्यक्षपदाच्या सुषमा साखरकर यांच्यासाठी मत मागत डोअर टू डोअर प्रचार करत मतं मागत आहेत. पती-पत्नीनं निवडणूक प्रचारात चांगलच आघाडी घेतली असून विरोधकांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. या प्रभागातील नागरिकांचाही या दोघांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. नवरा बायकोच निवडणूक रिंगणात असल्यानं संपूर्ण भंडाराकरांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

Continues below advertisement

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचार सभेसाठी भंडाऱ्यात

नगरपालिका निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा होत आहे. पहिली सभा भंडाऱ्याच्या दसरा मैदान इथं तर, दुसरी सभा तुमसर येथील नेहरू मैदानावर होत आहे. राज्यात महायुतीत असलेले सर्व घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भंडाऱ्यात स्वबळावर लढत आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. भंडाऱ्यात होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राचं भूमिपूजन आणि त्याला निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी केलं होतं.

मात्र, या जलपर्यटनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आणि त्याला परवानगी नसल्याचा आरोप करून भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.  देवेंद्र फडणवीस यांची इथं सभा होत असल्याने ते सहकारी पक्षासह विरोधकांवर काय निशाणा साधतात, याकडे भंडारावाशियांचे लक्ष लागलं आहे. 

हे हि वाचा