एक्स्प्लोर

Baramati ZP Election: अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली? पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान

Baramati ZP Election Ajit Pawar: अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीकरांवर मोठा आघात झाला होता. शनिवारी बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

Baramati ZP Election Ajit Pawar: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानाला (Voting) भरभरुन प्रतिसाद मिळाला. अनेक गावांमध्ये मतदान केंद्रांबाहेर लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. जिल्हा परिषद (ZP Election 2026) आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 70 टक्के मतदान झाले. मात्र, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाकडे साफ पाठ फिरवल्याचे दिसले. (Barmati Latest news)

पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांनी मतदान करणं टाळल्याची चर्चा आहे. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांचे विमान कोसळले (Ajit Pawar plane crash) होते. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदाच्या बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर दुःखाचे सावट होते. काल बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांनी आवर्जून मतदान केले होते. मात्र, बारामतीमधील सामान्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. बारामतीमध्ये जिल्हा परिषद (Baramati ZP) निवडणुकीसाठी अवघे 54 टक्के मतदान झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पुणे जिल्ह्यातील वेल्हे याठिकाणी सर्वाधिक 79 टक्के मतदान झाले.

Pune Election news 2026: पुणे जिल्ह्यात सरासरी झालेल्या मतदानाची आकडेवारी (सरासरी)

जुन्नर: ६१.१८ टक्के

आंबेगाव: ६५.३० टक्के

शिरूर: ७५.६९ टक्के

खेड: ७५.४६ टक्के

मावळ: ७७.४३ टक्के

मुळशी: ६३.७९ टक्के

हवेली: ६८.०२ टक्के

दौंड: ६५ टक्के

पुरंदर: ६८.३७ टक्के

वेल्हे: ७९.३० टक्के

भोर: ७५.६२ टक्के

बारामती: ५४.९० टक्के

इंदापूर: ६५.६७ टक्के

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार

जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवार यांनी आभार मानले आहेत. अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा

अजितदादांच्या निधनानंतरही घड्याळाची टिकटिक जोरात; पुणे जिल्हा परिषदेत किती जागा मिळणार? 'प्राब'चा धक्कादायक Exit Poll समोर

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Embed widget