Baramati By Election 2026 : बारामतीच्या पोटनिवडणुकीत (Baramati By Election 2026) विनंती करूनही काँग्रेस (Congress) पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे उमेदवारांची छाननी झाली असून 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीने उमेदवारांची समजत काढतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी जर निवडणूक लागलीच तर सुनेत्रा पवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. यासर्वपार्शवभूमीवर बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची (Uddhav Thackeray Shiv Sena) पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका असल्याचेदिसूनआलंआहे. कारण अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena)आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
Uddhav Thackeray: बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका
बारामतीच्या पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनेकुठलीहीभीमीकाजाहीरनकरण्यामागची रणनीती काय आहे? ठाकरेंची शिवसेना अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपला पाठिंबा कोणाला जाहीर करणार? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे. तर शिवसेना ठाकरे गटाने अजूनही महाविकास आघाडीमध्ये असून काँग्रेस उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळेशेवटच्याक्षणीठाकरेंचीशिवसेनाकाहीवेगळीभूमिकाघेतेका, हेपाहणंदेखीलमहत्वाचेठरणारआहे.
Baramati By Election 2026: दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी अधिकृत जाहीर पाठिंबा सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला नाही. अद्याप ठाकरे शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. काँग्रेससोबत महाविकास आघाडीतील संबंध आपले चांगले राहावेत. आघाडी म्हणून आपण काँग्रेससोबत आहोत, हे एकाप्रकारे दिसावे तर दुसरीकडे ठाकरे शिवसेना सुनेत्रा पवार यांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा शिवसेना ठाकरे गट प्रयत्न करत आहे. अशीदेखीलचर्चाराजकीयवर्तुळातहोतआहे.
Shiv Sena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेस उमेदवाराला किसुनेत्रापवारांनापाठिंबा?
यामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेतला तर दोन्ही पक्ष सोबतचे आपले संबंध असेच टिकून राहतील आणि कोणताही पक्ष नाराज होणार नाही, ही रणनीती आखून ठाकरेंची शिवसेना अर्ज मागे घेण्याचे दिवसापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला नाही तर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला एक तर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा लागेल नाहीतर काँग्रेसचे उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा लागेल. या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं तर संजय राऊत यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसून उद्धव ठाकरे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्षाचा निर्णय जाहीर करतील, असे म्हटले आहे.
आणखी वाचा
