Baramati Byelection Election Commission: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीची (Vidhansabha Bypoll) घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच दोन्ही जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Maharashtra Byelection 2026)

Continues below advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होईल. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पार पडू शकते.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीमधून पोटनिवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार हे राज्यसभेवर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाले होते. 

Continues below advertisement

Shivajirao Kardile Bypoll: शिवाजीराव कर्डिलेंच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार?

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येणार का, हे बघावे लागेल. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल. दादा गेल्यानंतरची ही निवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत की ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. आणखी वाचा

अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय