Baramati And Rahuri Assembly By Election 2026: राज्याचेलक्षलागूनराहिलेल्या बारामती (Baramati) आणिअहिल्यानगरच्याराहुरी (Rahuri)या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. (Rahuri Election) मतदारसंघातील निवडणुकांसाठी आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. राज्याचेउपमुख्यमंत्रीदिवंगतअजितपवारांच्या अपघातीनिधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी, बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बिद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार

दरम्यान, आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बिद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. बारामतीच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने ही जागा लढवणार निर्धारकेलाहोता. मात्र नंतर काँग्रेसनेआपला उमेदवा अर्ज मागे घेतला. त्यामुळेआताबारामतीचीनिवडणूकबिनविरोधहोतनसलीतरीयाठिकाणीराष्ट्रवादीचंपारडंजडआहे. तर राहुरीच्या जागेसाठी 22 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेयामतदारसंघातनिवडणूकचुरशीचीहोणारआहे.

Rahuri Assembly By Election 2026: राहुरीगोविंद मोकाटे अक्षय कर्डीले यांच्यात मुख्य लढत

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण 374 मतदान केंद्रे आहेत...तर एकूण मतदारसंख्या 3 लाख 33 हजार 543 इतकी असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2 हजार 180 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेत...यासोबतच पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात असेल...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे...तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत...राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे समर्थक नेमकी कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.

बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026मतमोजणी : 4 मे 2026निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

इतर महत्वाच्या बातम्या

राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित