एक्स्प्लोर

Bandra Fort Alcohol Party: वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी परवानगी देताच कशी? ठाकरेंच्या सेनेकडून व्हिडीओ शेअर; राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

Bandra Fort Alcohol Party: वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी केल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने समोर आणल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Bandra Fort Alcohol Party: महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि संरक्षित हेरिटेज स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी (Bandra Fort Alcohol Party) केल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने समोर आणला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी महाराष्ट्र सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेवर थेट निशाणा साधत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून  सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याची घणाघात देखील त्यांनी केलाय. 

अखिल चित्रे यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेला, नंतर ब्रिटिश तसेच मराठा इतिहासाची साक्ष देणारा बांद्रा किल्ला या हेरिटेज स्थळी दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्पादन शुल्क विभाग आणि BMC परवानगी देतातच कसे? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Bandra Fort Alcohol Party: स्थानिक आमदार आणि संस्कृती मंत्री कुठे आहेत? 

अखिल चित्रे यांनी पुढे म्हटले आहे की, नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? असे म्हणत त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीका केलीय. तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून  सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याची घणाघात देखील त्यांनी केलाय.

Bandra Fort Alcohol Party: घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी शूट केल्याचा दावा

दरम्यान ही घटना 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असून स्थानिक रहिवाशांनीच व्हिडिओ शूट केल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे. या प्रकरणावर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राज्य सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Jitendra Awhad on Ashish Shelar: आशिषजी, राजकारणात एवढा गर्व ठेवू नये, सूरज निकलता है तो रात को डुबता भी है; जितेंद्र आव्हाडांचं शेलारांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget