एक्स्प्लोर

Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली

Balasaheb Thorat on Supriya Sule: राज्यभरात सध्या विधान परिषद निवडणुकीचे रणधुमाळी सुरु असतानाच, आता महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत.

Balasaheb Thorat on Supriya Sule: राज्यभरात सध्या विधान परिषद निवडणुकीचे (Vidhan Parishad Election 2026) नाट्य रंगात आले असतानाच, आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मविआने घेतलेल्या माघारीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच आता, "मतांची बेरीज नसेल तर कशाला लढायचे, असं म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत," असा खोचक टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव न घेता लगावला आहे. यामुळे उमेदवारी मागे घेण्यावरून मविआमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Supriya Sule: सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या? 

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील वाढत्या भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवले होते. त्या म्हणाल्या, "सध्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही रंगत दिसत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे यात लोकशाहीचा उत्साह नाही, तर प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार सुरू आहे. हाच घोडेबाजार होणार हे स्पष्ट असल्यामुळेच पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली आहे." सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

Balasaheb Thorat on Supriya Sule: बाळासाहेब थोरातांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर 

खासदार सुळे यांच्या या विधानानंतर नाशिकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआची बाजू मांडताना सुळे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष आक्षेप घेतला. थोरात म्हणाले की, "महाविकास आघाडीत माघारीनंतर नाराजी नाटक आहे. मात्र, लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या मार्गावर अवलंबून भाजपाने अनेकांना माघार घ्यायला लावल्याचे दिसून आलंय. मतांची बेरीज नाही तर कशाला लढायचे? असे म्हणणारे सुद्धा आमच्यात आहे, असे त्यांनी म्हटले. थोरातांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

Balasaheb Thorat: नाशिकमधील माघारीवर थोरातांचे स्पष्टीकरण

नाशिकच्या जागेवरून मविआने उमेदवार न देण्याबाबत बोलताना थोरात म्हणाले की, "नाशिकमध्ये उमेदवार न देण्यामागे महाविकास आघाडीची बैठक झाली असेल आणि काहीतरी रणनीती ठरली असेल," असे त्यांनी म्हटले. तसेच, नाशिकमधल्या महायुतीत विधान परिषदेबद्दल जो काही गोंधळ आहे. त्यात नेमका कोणा-कोणाला पाठिंबा द्यायचा असा महायुतीतला मोठा गोंधळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ 

आणखी वाचा

Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Maharashtra Live News Updates: अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Beed : 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget