एक्स्प्लोर

Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल

Bal Mane : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने यांनी विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

Bal Mane Vidhan Parishad Election 2026 मुंबई: कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला अर्ज मागे घेतला. यावेळी बाळ मानेंसोबत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरेसेनेत कमालीचा रोष पाहायला मिळाला. बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख केला. या सगळ्यावर आता बाळ माने यांनी एबीपी माझाशी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

बाळ मानेंचा विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल 

बाळ माने म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे मी ऐकलं आणि भविष्यात सुद्धा त्यांचं मी आता ऐकणार आहेत. देवेंद्र फडणवीस सोबत कौटुंबिक संबंध आहेत.. 1990 पासून संबंध आहेत. नितेश राणे आणि संपर्क साधला देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं होतं 55 मतं घेऊन तू का उभा राहतो? राजकीय करियर तुझं चांगलं राहणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलं तर स्वागत आहे, असं बाळ माने म्हणाले. 

बाळ माने पुढं म्हणाले की नितेश राणे यांच्या बंगल्याच्या समोर आपण आहोत... कोकणाच्या हितासाठी जे असेल तसा निर्णय घेईल सरकार पक्षात राहून लोकांच्या अडचणी सुटतील. मी आरएसएस स्वयंसेवक आहे... शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत या सगळ्यांनी मला प्रेम दिला 

काल संजय राऊत यांनी हाकालपट्टी झाल्याचे सांगितलं विनायक राऊत परत का येऊन बोलतात? विनायक राऊत यांना 2024 ला सुद्धा मला उमेदवारी द्यायची नव्हती त्यांना अन्य लोकांसोबत सेटिंग करायची होती. डोमकावळ्यासारखे ते काल आले... तुम्हाला बोलण्याचा काल अधिकार काय होता? असा पलटवार बाळ माने यांनी केला. 

कोकणात शिवसेनेची वाट लावण्याचे काम विनायक राऊत यांनी केलं. पदाधिकाऱ्याचे पत्र घेण्यासाठी सुद्धा ते पैसे घेतात. पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फर्न हॉटेलच्या इथे मोठी डील झाली... त्यात तुम्ही किती पैसे घेतले हे लोकांना सांगा, असं आव्हान बाळ माने यांनी विनायक राऊत यांना दिलं. 

विनायक राऊतांनी शिंदेंच्या सेनेची सुपारी घेतली : बाळ माने

बाळ माने पुढे म्हणाले की, जर मी काही चुकीचे केला असेल तर मला त्यांनी बोलावलं पाहिजे होतं वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती.  शिंदे सेनेकडून यांनी सुपारी घेतली की त्यांना बाळ माने नको आहे. शिंदे सेनेचे भाट विनायक राऊत आहेत. शिदेंसेनेला चॅलेंज देणारा नेता त्यांना कोकणात नकोय, असा आरोप देखील बाळ माने यांनी केला.

संजय राऊतांच्या 150 कोटींच्या डीलच्या आरोपानंतर संजय राऊत साहेब तुम्ही जबाबदार आहात कुठे काय बोलावं हा चर्चेचा  विषय आहे, असं बाळ माने म्हणाले. मी का अर्ज मागे घेतला?हे मी सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता तर नव्हती आणि आमच्याकडे मतं सुद्धा नव्हती. 

उद्धव ठाकरेंची माझं बोलणं झालं नाही पण इतर वरिष्ठ नेत्यांची माझं बोलणं झालं. भास्कर जाधव यांच्याशी बोलणं झालं नाही घोडेबाजार खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. फक्त 55 मतं मिळून पराभव होणे. राजकीय करिअरला चांगलं नव्हतं, असं देखील बाळ माने म्हणाले. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Dhairyasheel Mohite Patil: 'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Embed widget