Bajrang Sonwane on Ajit Pawar Death Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर (Ajit Pawar Death Plane Crash) अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवी शंका उपस्थित केलीय. विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं सोनवणेंनी म्हटलंय. दमानियांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाची चौकशी झाली पाहिजे. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या कशा सापडल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

Continues below advertisement

बजरंग सोनवणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला घडवण्यामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. 1999 पासून त्यांचा माझा संबंध आला. अजित दादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट दुःखात आहे, देश दुःखात आहे. हा सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. बीड जिल्ह्यात नसेल, असं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Bajrang Sonwane on Ajit Pawar Death: बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही?

दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही. दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असं आम्ही काम करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही.राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो. बीडहून संभाजीनगर आणि तिथून आम्ही सोबत प्लेनने पुण्याला गेलो होतो. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला. मी सुनेत्रा पवारांच्या शपथविधी बाबत बोलणार नाही. पवार साहेब प्रमुख होते, आहेत आणि राहतील, असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले. 

Continues below advertisement

Bajrang Sonwane on Ajit Pawar Death: विमानात बॉम्ब होता का? हे तपासलं पाहिजे

बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग 5 बॉडी कशा सापडल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे CCTV फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.  

आणखी वाचा 

Sanjay Shirsat: शरद पवारांनी 2022 साली एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला, खातेवाटपाबाबत चर्चाही झाल्या, पण...; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा