Bajrang Sonwane Letter to Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विविध न्याय्य मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे उपोषणास बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने त्यांच्याशी संवाद साधावा आणि उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठवले आहे.
खासदार सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना वारंवार आंदोलनाचा खडतर मार्ग स्वीकारावा लागत आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर आणि विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्यांच्या प्रकृतीकडे प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
Bajrang Sonwane Letter to Devendra Fadnavis: हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा प्रश्न
आपल्या पत्रात खासदारांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तीव्र भावना या आंदोलनाशी जोडलेल्या आहेत. समाजातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती अधिक संवेदनशील बनत चालली आहे.
Bajrang Sonwane Letter to Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा
राज्य शासनाने या प्रश्नाकडे केवळ एक प्रशासकीय बाब म्हणून न पाहता पूर्ण गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहावे, असेही पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जरांगे पाटील यांच्याशी थेट संवाद साधावा. तसेच, शासनाने आपली भूमिका स्पष्ट करून कायदेशीर तोडगा काढावा आणि उपोषण त्वरित सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी, अशी विनंती खासदार सोनवणे यांनी केली आहे.
What are Manoj Jarange demands: मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या?
- निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.
- हैदराबाद गॅझेटिअरचा केवळ जीआर काढण्यात आला आहे, परंतु त्यातील संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. नोंदींनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि त्याची व्हॅलिडिटी कशी देणार, हे स्पष्ट करावे.
- सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटिअरचा तातडीने जीआर काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी.
- मराठा समाजासाठी मराठा आणि कुणबी असे स्वतंत्र मंत्रालय तत्काळ स्थापन करण्यात यावे.
- अंतरवाली सराटीतील गुन्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
- ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना प्रमाणपत्रे द्यावीत. तसेच ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना लगेचच हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावे.
- सारथी संस्थेच्या सर्व प्रलंबित योजना सुरू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वितरीत करावा आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सोयी-सुविधा आणि सवलती देण्याबाबत काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी करावी.
- शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच पुन्हा जुने रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्यावेत.
- EWS, SEBC आणि ESBC प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा तरुणांना आजच्या आज नियुक्ती पत्रे देण्यात यावीत.
- अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांनी वाहने घेतली आहेत, त्यांचा प्रलंबित असलेला संपूर्ण व्याज परतावा सरकारने जमा करावा.
- सगे-सोयरे बाबतच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
- मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्यात यावी.
- राज्यामधील जात पडताळणी समिती बरखास्त करा.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
