Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: बीडच्या केज (Kej) तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात (Vilas Ghule Case) पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी एका जाहीर कार्यक्रमात अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Continues below advertisement

एका कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना खासदार सोनवणे म्हणाले, "आपण चांगलं केलेलं कुणाला बघवत नाही. आपल्याला नीतिमत्तेने माहीत आहे आपण कसं वागतो. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' याप्रमाणे आपण विचार करायचा. माझ्या दृष्टीने हा माझ्यावर कमी मोठा आघात नाही. लहान वयातल्या मुलाला मी काहीतरी शिकवत होतो. बायकोचा विरोध असल्याने राजकारण नक्कीच शिकवलं नाही. तो माझं काम हलकं करत असताना कुणाला बघवत नसेल, म्हणून त्याला कुठेतरी अडकवायचं काम सुरू आहे," असे त्यांनी म्हटले. 

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: पुढचं नाव घेताना एवढं सोपं होणार नाही

बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, "त्याचं नाव का घेतलं? असं हे माझ्या मुलीने मला सांगितलं. त्यांना चांगलं माहितीये माझं इमोशनल कुठे अडकलं आहे. मुलामध्ये कुणीही अडकलेला असतो, आणखी वादळ गेलं नाही. राजकीय हस्तक्षेपामुळेच जबाबात नाव आलं. जरासं ब्लॅकमेल केलं की जबाबात नाव येतं, असं वाटलं की आता आणखी ब्लॅकमेलिंग चालू आहे. आता पुढचं ब्लॅकमेलिंग केलं की आरोपीत नाव येईल, पण आता मी जागरूक आहे. तिथं नाव घेतलं तिथं मी गप बसलो, पण पुढचं नाव घेताना एवढं सोपं होणार नाही," असे ते म्हणाले. 

Continues below advertisement

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: मी व्हायबल होणार नाही

आपल्या राजकीय विरोधकांना थेट इशारा देत खासदार सोनवणे पुढे म्हणाले, "हे असं करणं ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही, येड्या गबाळ्याचं काम नाही. कुभांड रचायचं काम ज्यांना सवय आहे त्यांनीच करणे, त्यांना ते लखलाभ असो. त्यांची इच्छा एकच आहे की मी व्हायबल व्हावं, पण मी सांगतो मी व्हायबल होणार नाही... नाही... नाही."

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: मी मागे हटणार नाही

आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम राहत त्यांनी शेवटी सांगितले, "काय केलं तरी मला निवडणूक लढवायची आहे, हे मी माझ्या मुलाला, बायकोला आणि घराला सांगितलं होतं. आता काहीही होईल, मी मागे हटणार नाही. तुमच्यावर जे काही आरोप आहेत ते मी सिद्ध करून दाखवणार, आणखी एक महिना मी काही बोलणार नाही, एक महिन्याच्या नंतर बोलतो," असे बजरंग सोनवणे म्हणाले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना