मुंबई : राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षापासून शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट शब्दात या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय न बदलल्यास संघर्ष अटळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, राज्य सरकार हा निर्णय कायम ठेवणार की बदलणार हे पाहावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी ही देशाची भाषा आहे, आपल्या मुलांनाही हिंदी यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटलंय. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी राज ठाकरेंना सवाल करत हिंदी भाषेच्या निर्णयाचा समर्थन केलं आहे. तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग गरिबांच्या मुलांनी का शिकू नये, असे कडू यांनी म्हटले. 

भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाते असं नाही. आम्ही मराठी वापरुच, मराठी भाषा वापरली पाहिजे याबाबत दुमत नाही, पाट्या मराठीच असाव्या, पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार? मराठीचा बाणा ठेवावाच, पण आम्ही 8 भाषा शिकू, काय हरकत आहे? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा घोषित करा, महाराष्ट्रात आम्ही मराठीच आहोत, देशात एक भाषा नको का?, असा सवाल उपस्थित करत आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरेंच्या भूमिके स्पष्टपणे विरोध केला आहे. मला वाटतं, आमदार-खासदार, अधिकाऱ्यांची पोरं 10-10 भाषा शिकतात, मग गरिबांच्या पोरांनी भाषा शिकल्या तर गैर काय? भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाते असं नाही. आम्ही मराठी वापरुच, मराठी भाषा वापरली पाहिजे याबाबत दुमत नाही, पाट्या मराठीच असाव्या, पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार? तुमचा मुलगा जर्मनीत जाऊन शिकत असेल, तर इथल्या मुलांना शाळेत जर्मनी शिकवली तर वाह वाह होते आणि हिंदी शिकवली तर ते चुकीचं आहे का?, असा सवाल बच्चू कडू यांनी विचाला. तसेच, मराठीचा बाणा ठेवावाच, पण आम्ही 8 भाषा शिकू, काय हरकत आहे? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा घोषित करा, महाराष्ट्रात आम्ही मराठीच आहोत, देशात एक भाषा नको का? असेही कडू यांनी म्हटले. 

हेही वाचा

धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांतून का दूर राहतात, प्रकृतीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीच दिली माहिती