Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026 मुंबई: पदासाठी युती करणारा बच्चू कडू (Bacchu Kadu) नाही. मुद्यांसाठी युती करणारे आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू (Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026) जाईल एवढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी दिली. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2026) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा सुरु होती. तसेच विधान परिषदेवर जायचं असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहितीही समोर आली होती. या सगळ्या चर्चांनंतर आज बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु...पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितले. 1 लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनाच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलनिकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझा मतदारांना आवडला नाही. गोतावळा होता, त्यात आम्ही हरलो, असं बच्चू कडूंनी सांगितले. (Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026)
पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ- बच्चू कडू (Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026)
मला प्रस्ताव माध्यमातून कळला. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती. पण या विषयावर चर्चा झाली नाही. विधान परिषदसाठी अर्ज भरायाला कागदपत्र बॅगेत असतात. पण चर्चा व्हायला हवी, मुद्दे आमचे महत्वाचे आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. प्रहारवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणाची ताकद नाही. आमची लायकी नाहीये का? 1 जागा मिळाली असती. पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ, अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली.विलनीकरणाबाबत चर्चा तर झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघूया...किंतू-परंतू वर कशाला आत्ता बोलायचं. मी चेहऱ्यावरून आनंदी आहे. कारण नाव माझं कडू आहे, चेहरा कडू राहून कसं चालेल. एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांचा मजूराला, दिव्यांगना जर न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम अजून करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यावा, एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, असंही बच्चू कडू म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी दिली होती साथ- (Bacchu Kadu And Eknath Shinde)
प्रहार जनशक्ती पक्षाची (Prahar Janshakti Party) बच्चू कडूंकडून 1999 ला स्थापना करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी साथ दिली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2024 ला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या होत्या. पण सर्व जागी पराभूत त्यांचे उमेदवार पराभूत झाले. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीला 1.55 टक्के म्हणजेच 3.07 लाख मतं मिळाली होती.
विधान परिषदेसाठी भाजपकडून कोणाला संधी- (BJP Vidhan Parishad Candidate List)
भाजपकडून विधान परिषदेसाठी सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
- उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
- मतदानाची तारीख: 12 मे 2026
- मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
- मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
