Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Bacchu Kadu On Eknath Shinde: शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे सत्तेमध्ये सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष्य करताना दिसून येत आहे.

Bacchu Kadu On Eknath Shinde: शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे सत्तेमध्ये सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लक्ष्य करताना दिसून येत आहे. भंडाऱ्यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान शेतकरी आत्महत्येवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं आरोप त्यांनी केला आहे. तर कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. (Bacchu Kadu On Devendra Fadnavis)
बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. बच्चू कडूंनी एबीपी माझाशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ही भावना असावी की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला हवा. आम्हाला अपेक्षा आहे की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. 15 ते 20 दिवसांत आम्ही विदर्भात अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. चार दिवसात मी विदर्भामध्ये 20 सभा केलेल्या आहे. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल, असं बच्चू कडू म्हणाले. (Bacchu Kadu On Eknath Shinde)
शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू- बच्चू कडू (Bacchu Kadu On Eknath Shinde)
शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू...स्वबळावर की नाही, ते ठरले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचंच आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांकडून विदर्भाच्या ज्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण झाल्या पाहिजे. मुख्यमंत्री कामच करत नाही, असं आम्ही म्हणत नाही. नदीजोड प्रकल्पातून पाणी येईल तेव्हा येईल, मात्र आताच्या क्षणाला शेतकऱ्यांची गरज पूर्ण झाली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. नवी मुंबई इथं पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावर प्रसंगीच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच नावं नव्हतं. यावर देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील. तुम्ही त्यांचं नाव पत्रिकेवर लिहा की नका लिहू एकनाथ शिंदे लोकांच्या मनातले नेते आहेत, असंही बच्चू कडूंनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा सरकारला इशारा- (Bacchu Kadu On Maharashtra Goverment)
बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीला घेऊन नागपुरात जनआंदोलन केलं. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आता कर्जमाफी देताना शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे, यावर बच्चू कडू यांनी निशाणा साधला. बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफीत पूर्ण फसगत होत नाही. असं नाही की, कोणाला लाभचं होत नाही. काही दुरुस्त्या करणे आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत. अधिवेशनात आवाज उठवू आणि नाही झालं तर आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
फडणवीसांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत- कडू, VIDEO
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























