Babasaheb Patil on Sugar Price Hike : साखरेच्या दराबाबत राज्यसरकारकडून केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला असून खाण्यासाठीच्या साखरेचा कोटा आणि व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेचा (Sugar Price Hike) कोटा वेगळा ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खाण्यासाठी साखर दर कमी ठेवा आणि व्यावसायिक दर वेगळे ठेवा, अशी मागणी करण्यात आल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी सांगितलंय.
दरम्यान, उसाची एफआरपी (FRP) आणि साखरेची एमएसपी (MSP) याची लिंक करायला लागेल, तरच कारखानदार टिकतील, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळेल, असेही पाटील म्हणाले. (Babasaheb Patil on Sugar Price Hike)
सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दराचा ग्राहकांना थेट मोठा फटका बसत असूनऐनसणासुदीच्याकाळातवाढत्यादरानंसर्वसामान्यांचेआर्थिकगणितकोलमडण्याचीहीशक्यताबळावलीआहे. कारण 50 रुपये किलोने मिळणारी साखर डायरेक्ट 65 ते 70 रुपये किलोवर पोहोचली आहे. अशातच साखरेच्या दराबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यातआलाआहे. तर वाढत्या भावामुळे साखर आयतीबाबत केंद्र सरकारकडून नियोजन सुरू असल्याचीमाहिती पाटील यांची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलीआहे.
Babasaheb Patil on Sugar Price Hike : साखर आयातीबाबत केंद्र सरकारचे नियोजन सुरू
दरम्यान, चहासाठी, खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही, दहा टक्के साखरेचा वापर होतो. दुसरीकडे बिस्किट, शीतपेय, तसेच इतर व्यावसायिक कामासाठी मोठ्या प्रमाणात साखर लागते. त्यामुळे जेवढी सर्वसामान्य माणसांना साखर लागते त्याचा कोटा वेगळा ठेवून त्याचे दर वेगळे ठेवावेत, असा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. दरम्यान साखर आयातीबाबत केंद्र सरकारचे नियोजन सुरू असल्याचंही सहकार मंत्री पाटील म्हणालेत.
Dattatray Bharne: कारखान्याचा फायदा झाल्याने शेतकऱ्यालाहीनक्कीच फायदा होईल
ज्या कारखान्यामध्ये साखरेचा साठा आहे, त्या कारखान्यांमध्ये साखरेचा भाव आल्यानंतर शेतकऱ्याला फायदा होणार. आजच्या घडीला साखर कारखान्याकडे साठा उपलब्ध नाही. ज्याच्याकडे उपलब्ध आहे त्याला नक्की फायदा होईल. कारखान्याचा फायदा झाल्याने शेतकऱ्याला फायदा होईल. अशीप्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणेयांनीदिलीआहे. MSP 4300 रुपये केली पाहिजे, यामागणीसंदर्भातबोलतानातेम्हणालेकी, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. याबाबतीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब असतील, आम्ही निश्चित या प्रकार केंद्राकडे पाठपुरावा करू. असेहीतेम्हणाले.
Sugar Imports Duty: केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने आता मोठं पाऊल उचलले आहे. वाढत्या किमती आणि घटत चाललेल्या पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात साखरेची (Sugar Price Hike) उपलब्धता सुधारण्यासाठी सरकारने 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात सुमारे 40 टक्क्यांची मोठी वाढ (Sugar Price Hike) झाली आहे. असे असतानाच हा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करणे आणि बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
