Babanrao Taywade, Nagpur: शैक्षणिक सत्र सुरु होऊनही अद्याप ओबीसी वसतीगृहात (OBC Students Hostel) विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झालेले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचे सांगत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी दिली आहे. सरकार ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या एकूण 72 वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा अद्याप मुहूर्तच निघालेला नाही. जागा उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थ्यांवर सध्या बेघर राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनातील या अनास्थेबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार असल्याचेत्यांनीएबीपीमाझाशीबोलतानासांगितलंय. (Babanrao Taywade on OBC Students Hostel)
वसतीगृहातील ओबीसी विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्याची मागणी
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील मुले मुली मोठ्या आशेने शहरांत आलीय, पण वसतिगृह सुरु नाही अशीपरिस्थितीआहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला, पण निवासाची सोयच न झाल्याने त्यांचे भवितव्य अंधारात आलंआहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता मिळावा. अशीमागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनीकेलीआहे. तसेचयासंदर्भातते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार असल्याचेतेम्हणाले.
Babanrao Taywade: आम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या एकाही माणसाची तक्रार नाही
आरक्षणासंदर्भातील 58 लाख नोंदीचा विषय हा माझ्या दृष्टीने आता जुना झालेला आहे. या 58 लाख नोंदी सापडल्या त्या 1948 पासून ज्या दिवशी तो आकडा डिक्लियर झाला त्या दिवसापर्यंत आहे. त्या दिवसापर्यंत सापडलेल्या त्या नोंदी आहेत. त्या 58 लाखांमध्ये विदर्भातल्या 38 लाख आहे, उत्तर महाराष्ट्राचे 10 लाख आहे, या लोकांकडे पिढ्यान पिढ्या प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे आहे, माझ्या वडिलांकडे आहे, माझ्या पोराकडेही आहे. आमच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर आम्ही कशाला म्हणून की आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा एकाही माणसाची तक्रार नाही की आम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही. कारण ते वर्षानुवर्ष आमच्याकडे आहे.
तर राहिला मराठवाड्याचा प्रश्न, तर त्यासाठी जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता ज्या काही सरकारने नियम ठरवले आणि हे देशामध्ये सारख्या वडील, आजोबा, पंजोबा, खापरपंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावरती जोपर्यंत त्या जातीची नोंद नाही, आणि जोपर्यंत ते त्यांच्या वंशावळीनुसार जुळत नाही, तर त्याला जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही आणि त्याची व्हॅलिडीटी सुद्धा होऊ शकत नाही. असेही डॅा. बबनराव तायवाडे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
