Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच आरोपी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करा, असे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्हात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा एसआयटी ताबा घेणार अशी माहिती समोर येत आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अशोक खरातला आज न्यायालयात हजर केले. मागील सुनावणी प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

आजच्या सुनावणीत काय काय घडलं? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

  • अशोक खरातला कोर्टात VC द्वारे हजर केलं.
  • न्यायमूर्ती श्रीमती बी इन ईचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी
  • आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात दाखल
  • सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयात हजर
  • अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशीही न्यायालयात दाखल
  • तुझं नाव काय? न्यायाधीश आरोपीला नाव विचारले.
  • आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत देण्यात आली.
  • आता पुढील गुन्ह्यात आरोपीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला जाणार आहे.
  • कोण ताबा घेणार न्यायाधीश यांनी केली विचारणा...
  • आरोपी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात आरोपीला हजर करा, न्यायालयाचे आदेश
  • आरोपीला दुसऱ्या गुन्हात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा ताबा SIT घेणार
  • अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहात हजर करण्याची आणि पुन्हा त्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार

सरकारी वकील शैलेंद्र बागडे सुनावणीनंतर काय म्हणाले? (Ashok Kharat Case Nashik Crime News)

आरोपी विरोधात दुसरा गुन्हा होता. आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याचा अर्ज मंजूर केला आहे. उद्या आरोपी अशोक खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार, अशी माहिती सरकारी वकील शैलेंद्र बागडे सुनावणीनंतर दिली. 

अशोक खरात प्रकरणी सुनावणी, कोर्टात काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं?, अशोक खरातने सगळं सांगितलं, SIT च्या चौकशीतून हादरवणारी माहिती

Ashok Kharat: आधी 12 गुन्हे; आता आणखी 11 तक्रारी, घरात मृत्यू होईल अशी भीती घालायचा अन् 'ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती'च्या नावाखाली अशोक खरात नको ते करायचा