नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी अशोक खरातची (Ashok Kharat) गेल्या 4 दिवसांपासून एसआयटी चौकशी सुरू असून एसआयटीच्या चौकशीत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तसेच, दुसरीकडे पीडित महिलाही समोर येत असून खरातविरुद्ध गुन्हा दाखल करत आहेत. अशोक खरातप्रकरणात एका विद्यार्थीने देखील पुढे येऊन लैंगिक अत्याचाराची माहिती दिली आहे. तर, राज्यातील बडे नेतेही अशोख खरातच्या संपर्कात असल्याचे सोशल मीडियातील फोटोवरुन दिसून येत आहे. शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी भेटीबाबत खुलासा केला आहे. तर, आज प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा खरात बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता, याच अशोक खरातने लोकसभा (Loksabha) निवडणुकी निकाल बदलण्याचे आश्वासन काही नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली असून एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची सुत्रांची माहिती आहे. “धक्कादायक निकाल लावून देतो” म्हणत खरातने महिला नेत्यास पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा असून आता SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याचे समजते. खरातच्या कार्यालयात संबंधित महिला नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहिती समोर आली असून CCTV फुटेज SIT च्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, आता उत्तर महाराष्ट्रातील या महिल नेत्या कोण आहेत आणि त्यांच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.  

उद्योगपतीकडून 20 कोटी लुटले

अशोक खरात पहिल्यांदा स्वत: महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचा धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता. यावेळी एका प्रकरणात एक महिला आणि बड्या उद्योगपतींमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर अशोक खरातने संबंधित बड्या उद्योगपतीला फोन केला आणि तू ज्या महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले, ती महिला प्रेग्नंट राहिली. तू हे काय केलं?, आता हे प्रकरण मिटवायला लागेल, असं सांगितले. मात्र संबंधित महिला प्रेग्नंट नव्हती. अशोक खरातने खोटं सांगून बड्या उद्योगपतीकडून टप्प्याटप्याने 20 कोटी रुपये लाटले. याबाबत महिलेला कोणतीही कल्पना दिली नाही, अशी माहितीही समोर आली आहे.  

Continues below advertisement

हेही वाचा

अरे तू काय केलं, ती महिला प्रेग्नंट झाली...; अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन, पुढे काय घडलं?