मुंबई: भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूचे नेते के. अण्णामलाई (Annamalai) यांनी काल (सोमवारी, ता १२) राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आपल्याला मुंबईत येण्यापासून रोखून दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी अण्णामलाई (Annamalai) यांचा उल्लेख रसमलाई असा करत, त्यांना मुंबईच्या मुद्द्यांवर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला होता; त्याला अण्णामलाई (Annamalai) यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयावरती एक पोस्ट करत, रसमलाई इफ़ेक्ट (अण्णा मलई) म्हणत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आल्याच्या एक फोटो शेअर केला आहे.(Annamalai)
Sanjay Raut Post: संजय राऊत यांची पोस्ट काय?
संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "रसमलाई इफ़ेक्ट (अण्णा मलई) रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले (म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी ;मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता)काय बोलायचे यांना?", यासोबत त्यांनी महायुतीच्या कार्यक्रमाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष लुंगी घातलेले दिसत आहेत.
K Annamalai VS Thackeray : अण्णामलाई अन् ठाकरे यांच्यातील वाद काय?
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रचार सभेवेळी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा करत, त्यांना मुंबईच्या मुद्द्यांवर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला होता; त्याला आता अण्णामलाई यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर टीका करणारे ठाकरे बंधू मूर्ख आहेत, त्यांना मूलभूत समज नाही असं अण्णामलाई म्हणाले. आपल्याला मुंबईत येण्यापासून कुणी रोखू शकत नाही, आपण मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हानही दिलं आहे. के अण्णामलाई यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
K Annamalai : मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याचं अण्णामलाईंचं वक्तव्य
मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तूनही त्यांच्यावर टीका झाली. सर्वबाजूंनी टीका होत असल्याने के अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांमध्ये त्यांची बाजू स्पष्ट केली. तामिळ भाषेतून बोलताना के अण्णामलाई म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणताना ते गुजराती नाहीत असा अर्थ होतो का? आपण मुंबईला जगाची राजधानी म्हणतो, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी उभारलेले शहर नाही का?"
K Annamalai On Thackeray : ठाकरेंना आव्हान
के अण्णामलाई पुढे म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूलभूत समजही नाही. मी मुंबईत आलो तर माझे पाय तोडण्यात येतील असं सामना वृत्तपत्रात लिहिलंय. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. मी अशा धमक्यांना घाबरत नाही."
