Anna Hazare Protest Ahilyanagar : अहिल्यानगर येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच मौन आंदोलन सुरुकेलंआहे. तरया आंदोलनादरम्यान अण्णा हजारे (Anna Hazare) काहीसे भाऊक झाल्याचेबघायलामिळाले. दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी नगरशहरातील वाडिया पार्क येथे अण्णांनी मौन आंदोलनाला सुरुकेलं. दरम्यान आंदोलनस्थळी (Ahilyanagar) पोहचताच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती पोस्टर पाहताच अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

Continues below advertisement

Anna Hazare Protest : विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू असून अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ अण्णांचे मौन आंदोलन सुरुआहे. या आंदोलस्थळाला नगरचे जंतर मंतर असे नामकरण करण्यातआलेआहे. एकीकडेनवी दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. "लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडविण्याबाबत" असा या पत्राचा विषय असून, आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिसी कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Continues below advertisement

Anna Hazare Letter to PM Modi: समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक

दरम्यान, 'आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी 2024 मध्ये नीट च्या परीक्षेचे पेपर फुटी व गोंधळ समोर आला. यावर्षी सुद्धा देशात 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेल्या असताना पेपर फुटली. 22 मुलांनी निराश होऊन आत्महत्या केल्या. फेर परीक्षेच्या निकालांमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याच्या बातम्या आहे. सरकारी कारभारामध्ये काही गैरकारभार उघडकीस आला की त्याची जबाबदारी खालच्या माणसांवर टाकायची आणि चांगलं जे असेल त्याच श्रेय सरकारने घ्यायचं हे योग्य नाही. वरिष्ठांची जनतेप्रती जबाबदारी व उत्तरदायित्व आहे," असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेल्यापात्रात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या