एक्स्प्लोर

Anil Parab on Ramdas Kadam: रामदासभाईंचा एक-एक दावा तर्काने खोडून काढला, कदमांना कोर्टात खेचण्याचा इशारा, अनिल परबांच्या वादळी पत्रकारपरिषदेत काय घडलं?

Anil Parab on Ramdas Kadam: मेळाव्यातील आरोपांवर आज ठाकरे गटाकडून आमदार अनिल परब उत्तर देत आहेत. यावेळी बोलताना अनिल परबांनी रामदास कदमांचा कच्चाचिट्ठा काढला आहे.

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा लक्षवेधी ठरला तो एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या वादग्रस्त वक्तव्याने. शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा पार पडला. तर, नेक्सो सेंटर येथे एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) दसरा मेळावा संपन्न झाला. यावेळी शिंदेंच्या मेळाव्यामध्ये बोलताना रामदार कदम यांनी उध्दव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यावरती आज ठाकरे गटाकडून आमदार अनिल परब उत्तर देत आहेत. यावेळी बोलताना अनिल परबांनी (Anil Parab) रामदास कदमांचा (Ramdas Kadam) कच्चाचिट्ठा काढला आहे. त्याचबरोबर रामदास कदमांच्या पुतण्याने स्वतःला का संपवलं? त्यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, ते जाळून घेतलं? का तिला जाळलं, का काय झालं? हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले, खेडमध्ये त्या बंगल्यावरुन काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे, असे गंभीर प्रश्न आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहेत. 

Anil Parab on Ramdas Kadam Accusation: कुठलाही मृतदेह दोन दिवस ठेवता येतो का? 

त्याचबरोबर रामदास कदम यांनी केलेले आरोप खोडून काढताना अनिल परब म्हणाले, त्यांनी केलेले आरोप शंभर टक्के खोटे आहेत. मला एक गोष्ट सांगा की, बाळासाहेब यांना भेटायला असंख्य गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठली बॉडी दोन दिवसासाठी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? याबाबत कदमांची अक्कल गुडघ्यात आहे. त्यांना जे काय कुणी सांगितलं आहे, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवघराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली काही जरी केलं तरी असं करता येत का? कशी त्याची बॉडी ठेवू शकता येईल, दोन दिवस आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहे आणि रामदास कदम जे म्हणतात ना तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते.  हे मोल्ड कुठे ठेवले ते माहित आहे, आपल्याला माहीत असेल अंधेरीला स्टेडियम झालं, अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेअर्स त्या वेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते, बाळासाहेबांच्या नंतर हे मोल्ड जे ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले, हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले होते, असंही परब यांनी म्हटलं आहे.

Anil Parab on Ramdas Kadam Accusation:  कोण डॅाक्टर आहे. ज्यांनी खोटी माहिती पसरवली...

पुढे अनिल परब म्हणाले, तिथे तेव्हा उपस्थित होते त्यांच्यापैकी शरद पवार आहेत ना..ते त्याचे उत्तर देवू शकतात ना…मिलिंद नार्वेकरही आहेत. कोण डॅाक्टर आहे. ज्यांनी खोटी माहिती पसरवली त्यांना समोर आणा. पक्ष घेतला, माणसे घेतली पण तरीही काही होत नसल्याने आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत. तेव्हा असा एक प्रस्ताव आला की अँब्युलन्स द्वारे मृतदेह नेवून पार्कात दर्शनासाठी ठेवायचे. पण नंतर निर्णय बदलून अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय झाला, असंही पुढे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

Anil Parab on Ramdas Kadam Accusation:  निवडणुका आहेत त्यामुळं वातावरण तयार करत आहेत

बाळासाहेब ठाकरे यांनी कायदेशीर बाबीचा अभ्यास करून मृत्यू पत्र बनवलं होतं, रामदास कदम आता १७वर्षांनंतर शिळ्या कडीला ऊत आणत आहेत. महापलिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामुळं वातावरण तयार करत आहेत, जे मूळ प्रश्न आहेत ते भरकटवत आहेत, सकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर अँब्युलन्समध्ये बाळासाहेब यांचे पार्थिव घेऊन जाऊ असा प्रस्ताव होता पण गर्दी खूप होणार होती म्हणून मग तो प्रस्ताव मागे घेतला. जयदेव ठाकरे कोर्टात आले होते.. नंतर काय झालं तुम्हाला माहितीये...
तुम्हाला जर शंका असेल तर कोर्टात जा..हे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर आणायचे. राज उद्धव ठाकरे एकत्र येताय... त्यामुळे त्यांचा सुफडा साफ होणार आहे, यामुळे हे सगळं सुरू आहे, असंही पुढे अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

Anil Parab on Ramdas Kadam Accusation: मला माहितीये रामदास कदम कधी यायचे कधी जायचे

एकनाथ शिंदे यांची काय मजबुरी आहे की या लोकांना का सांभाळताय? ते जर म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालतात तर मग यांना ते काहीच बोलत नाहीत. मी विचारतोय की मातोश्रीमध्ये तो बाकडा कोणता आहे? जिथे रामदास कदम झोपायचे? तो बाकडा मी शोधतोय...अशा बाकड्यावर कोणाला झोपू देत नाही. मला माहितीये रामदास कदम कधी यायचे कधी जायचे, मी बाजूलाच राहतो, मी विभाग प्रमुख आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो.त्यामुळं ही जबाबदारी माझ्याकडे होतो. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो असंही पुढे अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

Anil Parab on Ramdas Kadam Accusation: रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो 

बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी त्या रूममध्ये डॉक्टर पथक होतं, २४ तास डॉक्टरांचं पथक तिथे होतं. रामदास कदम म्हणतात की नार्कोटेस्ट करा, आता मी मागणी करतो रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा. मी रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो त्याच्यातून जो पैसा येईल तो पूरग्रस्तांना मी देईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पत्राचा मी ट्रस्टी आहे...ते कसा बनवलं हे मला माहितीये...ठसे घेतले का? मला माहितीये, मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जातात का? हे ज्ञान सुद्धा त्यांना नाही असंही परब पुढे म्हणालेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
Embed widget