Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय झाला. बिनविरोध विजयी झाल्यानंतर अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांची सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे.

Continues below advertisement

अनिकेत तटकरेंची भावूक पोस्ट, काय म्हणाले? (Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026)

दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग, असं म्हणत अनिकेत तटकरे म्हणाले की, कधी नियती आपल्या आयुष्यात अशी काही किमया करत असते की अगदी आश्चर्यचकित करुन टाकते. दि. 24 मे 2018 माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय दिवस जेव्हा मला प्रथमच आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी लाभली. अगदी वर्षभरानंतरच...दि. 24 मे 2019 खासदार सुनील तटकरे प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. काळाने पुन्हा एक विलक्षण वर्तुळ पूर्ण केले. दि. 4 जून 2024 रोजी जनतेने सुनील तटकरेंवर पुन्हा एकदा विश्वास ठेवत त्यांना दुसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत पाठवले. आणि काल, दि. 4 जून 2026 रोजी मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली. या योगायोगाकडे पाहताना मन नकळत भावूक होते. कारण हा केवळ तारखांचा योग नाही, तर ही जनतेने दाखवलेल्या विश्वासाची, कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथ-सहकार्याची आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाची साखळी आहे. काही गोष्टी आपण ठरवतो, काही गोष्टी नियती ठरवत असते. या क्षणी माझ्या मनात अभिमानापेक्षा कृतज्ञता अधिक आहे. हा योगायोग जपून ठेवावा असा आहे. कारण यात तारखांपेक्षा अधिक नात्यांचा आणि विश्वासाचा एक अनमोल इतिहास दडलेला आहे, असं अनिकेत तटकरे म्हणाले. 

पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध- (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी काल अखेरचा दिवस होता. पाच ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत.

बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नावं- (Names of candidates elected unopposed) 

1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप

2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस

3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना

4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...