Amravati Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांवरील निवडणुकीचं नाट्य अख्ख्या राज्यानं पाहिलंय. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक (Amravati Vidhan Parishad Election 2026) नाट्य राज्यात चांगलंच गाजलंय. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय. यानंतर बाजरिया पिता-पुत्रांनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा आरोप करीत त्यांच्यावर अमरावतीत गुन्हे दाखल करण्यात आलेय. या संपूर्ण प्रकरणानंतर विप्लव बाजोरिया यांचे वडील माजी आमदार आणि शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच 'एबीपी माझा'शी संवाद साधलाय. 

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यासंदर्भात कोणाचा दबाव होताय? असा सवाल त्यांनी केलाय. याआधी असाच अर्ज भरून आपण आणि मुलगा दोघंही आमदार झाल्याचं ते म्हणालेत. अमरावतीतील सर्व उमेदवार आपल्या मुलाच्या उमेदवारीला घाबरल्याचं ते म्हणाले. मैदानात येऊन लढल्यानंतर हार आणि जीतचा फैसला झाला असता, असं त्यांनी म्हणत भाजप आणि काँग्रेसला चिमटा घेतलाय. अमरावतीत झालेल्या अन्यायासंदर्भात आपल्याला न्यायालयातून 100 टक्के न्याय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नाहीतर निवडणूक पिटीशनमध्ये ही निवडणूक 100 टक्के रद्द होणार, असे देखील गोपीकिशन बाजोरिया म्हणाले.  

दरम्यान, विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर आपल्या मुलाचा नैसर्गिक हक्क होता. 50 वर्षानंतर आपल्या मुलाच्या रूपाने 2018 मध्ये तिथे पहिल्यांदाच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. मात्र, एकनाथ शिंदे आणि पक्षाने घेतलेला निर्णय याबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही. पक्षाने परभणी-हिंगोलीत भविष्याचा विचार करूनच निर्णय घेतला असावा, असंही त्यांनी नमूद केलं आहे. 

Gopikishan Bajoria: नेमकं काय म्हणाले गोपीकिशन बाजोरिया?

शिवसेना उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, उमेदवारी फेटाळण्यामागचा सूत्रधार कोण आहे?  हे सांगता येणार नाही. माझा फॉर्म 100 टक्के लीगल होता, लीगल आहे. निवडणूक अधिकाऱ्यावर कुणी दबाव टाकला?, हे सांगणे उचित होणार नाही.  मी असाच उमेदवारी अर्ज आधी हिंगोली-परभणी आणि अकोल्यातही भरला होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आधीचे उमेदवारी अर्ज स्वीकृत केलेत. मी लोकांचे उमेदवारी अर्ज भरून देतो. माझाच उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकारी सांगतो की अर्जावर उमेदवाराची सही आणि शिक्का नाही.‌ मात्र, अर्जावर सही आणि शिक्का सर्व बरोबर आहेत. निवडणूक अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. आम्हाला अर्जातील एखादी त्रुटी असेल तर ती पूर्ण करण्याची संधी निवडणूक अधिकाऱ्याने दिली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज का बाद केलाय?,  याचा प्रश्न आजही माझ्या मनात आहे.  मी यासंदर्भात 50 निकालांचा अभ्यास केला आहे. अशा प्रकारांमध्ये निवडणूक रद्द झाली आणि आमदारांची निवडही रद्द झाली आहे. मालकाचा मालक कोण आहे? या गोष्टी लपलेल्या आहेत, याचे काही पुरावे नसतात. मला निवडणूक अर्ज रद्द केल्याची कोणतीही कॉपी सकाळपासून रात्रीपर्यंत दिली गेली नाही. मी अशा प्रकारचा पहिला निवडणूक अधिकारी देशात आणि राज्यात पहिला आहे. आम्ही उच्च न्यायालयात गेलेलो आहे. इलेक्शन रिटमध्ये कमी संधी असली तरी इलेक्शन पिटीशनमध्ये मला नक्की न्याय मिळेल.

आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. त्यात अटी घातल्या तरी चालतील. मला अमरावतीतील सर्व उमेदवार घाबरतात. निवडणूक लढण्यासाठी मैदानात या. हार आणि जीतचा फैसला फैसला नंतर होईल. माझ्या मुलाने स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरल्याने मी कोणावरही आरोप करणार नाही. माझ्यावर आक्षेप घेणाऱ्या काही उमेदवारांनी उमेदवारीही मागे घेतली. हिंगोली परभणी मतदार संघात माझा नैसर्गिक हक्क होता. 50 वर्षात तिथे कधीही शिवसेनेचा उमेदवार निवडून आला नव्हता. परंतु मी तिथून विजय मागच्यावेळी खेचून आणला होता, असे त्यांनी म्हटले.  

गोपीकिशन बाजोरिया पुढे म्हणाले की, पक्ष श्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. त्यांच्या निर्णयाचा मी आदर आणि स्वागत करतो. निवडणूक पिटीशनमध्ये मला 100 टक्के न्याय मिळेल आणि न्याय मिळाला नाही तर अमरावतीची निवडणूक शंभर टक्के रद्द होईल आणि अमरावतीत पुन्हा निवडणूक होईल. चर्चेत असलेला बाजोरिया पॅटर्न हा जनतेचे प्रश्न सोडवणारा आहे. मात्र, अमरावतीत 'बाजोरिया आला' या भीतीतून माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय, असा आरोप त्यांनी केला.

Who Is Gopikishan Bajoria?: कोण आहेत गोपीकिशन बाजोरिया?

- शिवसेनेचे विधान परिषदेचे सलग तीन टर्म्स आमदार. 

- अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य मतदार संघातून 2003 ते 2021 असे सलग 18 वर्ष आमदार. 

- 2021 मध्ये भाजपच्या वसंत खंडेलवालांकडून पराभव. 

- सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते

- विधानपरिषदेत पक्षाचे गटनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून काम केलेय.

- मुलगा विप्लव बाजोरिया 2018 मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार.

- विधान परिषद निवडणुकीत 'बाजोरिया पॅटर्न'ने त्यांनी स्वतः तीनदा आणि मुलाला एकदा आमदार केलं.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO