Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीरंगलीअसताना अमरावतीच्याराजकीयवर्तुळातूनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख (Harshjit Deshmukh) यांनाअचानक नागपूरच्या खाजगी रुग्णालयात भरती केल्याचीमाहितीआहे. देशमुखयांना अस्वस्थ वाटत असल्याने काल (9 जून) नागपूर येथील वेदांत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर विविध चाचण्या होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. दरम्यान, अमरावतीत हर्षजीत देशमुख गायब झाल्याच्या चर्चा राजकीयवर्तुळातरंगल्याअसताना मात्र ते रुग्णालयात असल्याची माहिती पुढेआलीआहे. (Congress candidate Harshjit Deshmukh)

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधान परिषद निवडणूक, तीन उमेदवार रिंगणात..

प्रवीण पोटे पाटील (भारतीय जनता पार्टी)हर्षजीत देशमुख (इंडियन नॅशनल काँग्रेस) निलेश विश्वकर्मा (वंचित)

अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, येथून भाजप कार्यकर्ते असलेल्या विप्लव बजोरिया यांनीच बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. मात्र, आज बजोरिया यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनीच विप्लव बाजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांना बजोरिया यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे, भाजप महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. याशिवाय येथे भाजप महायुतीकडे संख्याबळ अधिक आहे. अमरावतीत 449 पैकी भाजप महायुतीकडे 222 एवढं संख्याबळ आहे. तर, महाविकास आघाडीकडे 148 एवढेच संख्याबळ आहे. दरम्यान, विप्लव बजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून 

विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)

  • भाजपा- 132 - 1 = 131
  • शिवसेना (शिंदे गट)- 57
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
  • शिवसेना (ठाकरे गट)- 20
  • समाजवादी पार्टी- 2
  • जनसुराज्य शक्ती- 2
  • राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
  • एमआयएम- 1 जागा
  • सीपीआय (एम)- 1
  • पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
  • राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
  • अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
  • महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
  • मविआ = 16+10+20+2+1 = 49
  • इतर = 03 
  • एकूण = 286 आमदार
  •  

इतरमहत्वाच्याबातम्या