एक्स्प्लोर

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेसचे हर्षजीत देशमुख थेट प्रचारात उतरणार नाही, नेमकं कारण काय?

Amravati Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे आता प्रकृती अस्वस्थतेमुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या (Amravati Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख (Harshjit Deshmukh) हे आता प्रकृती अस्वस्थतेमुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास असल्याचे समोर आले असून, डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे. 

Amravati Vidhan Parishad Election 2026: दोन किडनी स्टोन आणि डॉक्टरांचा सक्तीचा आराम

आपल्या प्रकृतीबाबत आणि भूमिकेबाबत स्वतः हर्षजीत देशमुख यांनी रुग्णालयातून मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरात 11 मिमी आणि 6 मिमी आकाराचे दोन किडनी स्टोन आढळून आले आहेत. यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील आठ दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचार दौऱ्यात दिसणार नाहीत.

Amravati Vidhan Parishad Election 2026: "मागच्या 8 दिवसांपासून पक्षाशी संवादच नाही!"

धक्कादायक बाब म्हणजे "मागच्या आठ दिवसांपासून माझा अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी कोणताही संवाद झालेला नाही. इतकेच नव्हे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्याशी माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी किंवा नंतर, अगदी या क्षणापर्यंत कोणताही संवाद झालेला नाही. माझे नाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीने सूचवले होते," असे देखील हर्षजीत देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Amravati Vidhan Parishad Election 2026:  यशोमती ठाकूर यांच्या 'मॅनेज' आरोपांवर दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आपलाच उमेदवार 15 ते 20 कोटी रुपयांमध्ये 'मॅनेज' झाल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या आरोपावर स्पष्टीकरण देताना हर्षजीत देशमुख म्हणाले की,  "यशोमती ठाकूर या केवळ रागाच्या भरात असे बोलून गेल्या. मात्र, त्यानंतर माझ्यावर पक्षातील कोणीही (अधिकृतपणे) आरोप केलेले नाहीत."

Amravati Vidhan Parishad Election 2026: काँग्रेस-वंचितच्या 'गुप्त' बैठका 

एकीकडे हर्षजीत देशमुख हे रुग्णालयातूनच निवडणूक लढण्यावर ठाम असताना, अमरावती काँग्रेसने मात्र पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अंतर्गत बैठक घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत एक 'गुप्त बैठक' घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. वंचितच्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. तर पक्षाने जरी वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर कोणाला पाठिंबा दिला, तरी आपण अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणातून मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका हर्षजीत देशमुख यांनी घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: उद्धव ठाकरेंच्या बैठकीला सर्व खासदार हजर; प्रत्यक्ष कोण आले अन् कोणी लावली ऑनलाईन हजेरी? संपूर्ण यादी

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं, विनायक राऊतांबाबत म्हणाल्या...
गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं, विनायक राऊतांबाबत म्हणाल्या...
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Embed widget