एक्स्प्लोर

Amol Mitkari on Ajit Pawar: अजितदादांना देव मानणाऱ्या अमोल मिटकरींचं विधान परिषदेतील डोळे पाणावणारं भाषण, व्याख्यानं देणाऱ्या मिटकरींना अजितदादांनी कसं हेरलं?

Amol Mitkari on Ajit Pawar: अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत शोक प्रस्तावावर भाषण केले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगताना डोळे पाणावणारे भाषण केले.

Amol Mitkari on Ajit Pawar Shok Prastav in Vidhansabha: अजित पवार यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं होतं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. मला कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला आमदार केले, असे उद्गार आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काढले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अजितदादांना त्यांना कशाप्रकारे राजकारणात आणले आणि सामान्य व्यक्तीपासून ते आमदार कसे केले, याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. (Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026)

महाराष्ट्राला एका धडाकेबाज नेतृत्त्वाला मुकावं लागलं. मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. आमच्या घरात कुठलाही राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांनी, आजोबांनी, खानदानात कोणाला ग्रामपंचायत सदस्यत्व काय असतं हे माहिती नव्हतं. 2019 साला बारामतीच्या शारदा प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्यानिमित्ताने एका व्याख्यानाचा योग आला. मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता. त्यादिवशी दादा उद्घाटन करुन जाणार होते. त्यांनी कार्यक्रमाचा विषय वाचला, वक्त्याचं नाव वाचलं, मला म्हणाले, तुम्ही कुठे असता, मी म्हटलं अकोल्यात असतो. तुम्ही काय करता विचारलं, मी म्हटलं, मी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांचा विचार मांडणारा वक्ता आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, असे मी त्यांना सांगितलं. चळवळीबद्दल नितांत आदर असणाऱ्या दादांनी माझ्या व्याख्यानाचा विषय विचारला.

माझ्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी आयोजकांना विनंती केली की, दादांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करुन निघून जावे. पण दादांना कोणीतरी सांगितलं की, संभाजी महाराजांचं चरित्र या व्यक्तीच्या तोंडातून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो. दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. दोन तास 15 मिनिटे दादांनी भाषण ऐकलं. भाषणानंतर तीन महिन्यांनी मला दौंड शुगर कारखान्यातून त्यांच्या स्वीय सहायकाचा फोन आला. त्यावेळी दादांनी म्हटलं, मी तीन महिन्यांपूर्वी बारामतीत तुमचं व्याख्यान ऐकलं, संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही. तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या, मला पक्ष कार्यालयात भेटा. त्यावेळी पक्ष कार्यालय बॅलार्ड पिअरला होतं, त्यादिवशी ते बंद होते. मग मला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांच्या घरी ढिकले साहेबांनी अजितदादांच्या भेटीचा वेळ दिला. अजितदादांनी मला विचारलं की, आमच्या पक्षात येणार का, काम करणार का?  मी म्हटलं, माझा राजकारणाशी संबंध नाही, तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो. त्यावेळी जयंत पाटील, भुजबळ साहेब तिकडे होते.

जयंत पाटील म्हणाले की, बुथ बांधणीचा कार्यक्रम हाती घ्या. तेव्हा दादा मिश्कील हसून म्हणाले की, हा बुथ बांधणीच्या कामाचा माणूस नाही. हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो. त्यामुळे याला आपण महाराष्ट्रभर आपण फिरवूया. शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेब, उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात निघाली होती. त्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होण्यासाठी दादांनी मला सांगितलं. त्याचदिवशी पक्षातील अनेक लोक दुसऱ्या पक्षात गेले होते. त्यावेळी मी अमोल कोल्हेंसोबत महाराष्ट्रभर फिरलो. त्यानंतर तीन महिन्यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. तेव्हा लोकांनी प्रचारसभेसाठी माझी मागणी केली. मला त्यावेळी महाराष्ट्र गाजवता आला, दादांसोबत फिरता आलं, 68 सभा मला मिळाल्या. तेव्हा दादांनी मला पक्षाचा प्रचार करायला हेलिकॉप्टरची व्यवस्था करुन दिली. मी आणि जयंत पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा आमचे बरेच आमदार निवडून आले. मात्र, दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा 650 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी पराभवाचा मेळावा घेतल्यावर दादांनी म्हटलं की, एखादी सभा धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हेंची झाली असती तर 700 मतांचा फरक निघाला असता. तेव्हा कार्यकर्त्यांनी म्हटलं की, आता विधानसभा गेली तर जाऊ द्या, आता त्यांना विधानपरिषदेत संधी द्या. तेव्हा दादा चिडले. तेव्हा दादांच्या तोंडून आपसूक निघालं की, तुम्हाला विधानसभेत संधी देतो, त्यामध्ये निवडून येत नाही आता विधानपरिषद मागता. आता नाही, ते पोरगं लय फिरलंय, पक्षासाठी जीवाचं रान केलंय, मी करेन तर आमदार त्यालाच करेन. ती बातमी टीव्हीवर आली, तेव्हा अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात होतो. तेव्हा मला सुखद धक्का बसला, अशी आठवण अमोल मिटकरी यांनी सांगितली.

आणखी वाचा

अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Amol Mitkari : व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली?  पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget