Amol Mitkari : झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीच तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असासंतप्तसवालराष्ट्रवादीअजितपवारगटाचेआमदारअमोलमिटकरींनी  (Amol Mitkari) केलाआहे. यासंदर्भात थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, असानिर्वाणीचाइशाराहीत्यांनीदिलाआहे. एक महिन्यानंतर हा अहवाल दिला, तीन आठवड्यानंतर ब्लॅक बॉक्स सापडला. सुमित कपूर संदर्भात डीजीसीए एक शब्द काढला नाही. या कारवाईने आम्ही समाधानी नाही, असेहीअमोलमिटकरीम्हणालेत. तर डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशीमागणीहीत्यांनीयावेळीकेलीआहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. VSR व्हेंचअर्सला मोठा दणका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यावरआमदारअमोलमिटकरींनीअसमाधानव्यक्तकरतसखोलचौकशीकरत डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करण्याचीमागणीकेलीआहे.

Amol Mitkari on VSR : .....नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही.

दरम्यान, VSR कंपनी कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे. सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून ठेवल्याची आम्हाला शंका आहे. या संदर्भात VSR व्हेंचर्स आणि डीजीसीएने उत्तर दिले पाहिजे, नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही. डिजिसीए फक्त भुलथापा देण्याचा प्रयत्न करते, कारण गाव पातळीवर आता वातावरण पेटायला लागल आहे. त्यांच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान का देण्यात आलं? असाप्रश्नहीअमोलमिटकरींनीयावेळीउपस्थितकेलाआहे.

Amol Mitkari on DGCA: डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला

डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलंय. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असेअनेकसवालहीआमदारमिटकरींनीयावेळीउपस्थितकेलेआहेत.

ही बातमी वाचा: