एक्स्प्लोर

Amol Mitkari : डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला, पायलटबाबत खरं सांगितलं नाही तर तुम्हाला महाराष्ट्र जिवंत ठेवणार नाही; अमोल मिटकरींचा इशारा

Amol Mitkari reaction on DGCA Action: थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, असा निर्वाणीचा इशाराही अमोल मिटकरींनी दिला आहे.

Amol Mitkari : झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकी तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी  (Amol Mitkari) केला आहे. या संदर्भात थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. एक महिन्यानंतर हा अहवाल दिला, तीन आठवड्यानंतर ब्लॅक बॉक्स सापडला. सुमित कपूर संदर्भात डीजीसीए एक शब्द काढला नाही. या कारवाईने आम्ही समाधानी नाही, असेही अमोल मिटकरी म्हणालेत. तर डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. VSR व्हेंचअर्सला मोठा दणका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यावर आमदार अमोल मिटकरींनी असमाधान व्यक्त करत सखोल चौकशी करत डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Amol Mitkari on VSR : .....नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही.

दरम्यान, VSR कंपनी कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे. सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून ठेवल्याची आम्हाला शंका आहे. या संदर्भात VSR व्हेंचर्स आणि डीजीसीएने उत्तर दिले पाहिजे, नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही. डिजिसीए फक्त भुलथापा देण्याचा प्रयत्न करते, कारण गाव पातळीवर आता वातावरण पेटायला लागल आहे. त्यांच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान का देण्यात आलं? असा प्रश्नही अमोल मिटकरींनी यावेळी उपस्थित केला आहे.

Amol Mitkari on DGCA: डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला

डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलं. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget