Amol Mitkari : आधी अजित पवारांनी झापलं, आता अमोल मिटकरींची UPSC कडे चौकशीची मागणी; IPS अंजली कृष्णांवरच सवाल
Amol Mitkari on IPS Anjali Krishna : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Amol Mitkari on IPS Anjali Krishna : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ - अमोल मिटकरी
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहीत नसलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे. पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असल्याची आपल्याला शंका असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकी संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करणार असल्याची आमदार अमोल मिटकरी यांनी माहिती दिली आहे. ते अकोला येथे बोलत होते.
अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी- अमोल मिटकरी
अजित पवारांचं काहीही चुकलेलं नाही. विरोधक विनाकारण या मुद्द्यावर आकांडतांडव करीत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसल्याचे म्हणणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) या मग्रूर अधिकारी असल्याची टीका हि अमोल मिटकरी टीका हि अमोल मिटकरी यांनी केली. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)
1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका
Before You Go
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?























